
शिरपूर : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासनाने सातत्यपूर्ण प्रयत्न करून मतदार नोंदणी करून घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर मतदार संख्येत वाढ झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात ३३६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी शरद मंडलिक यांनी गुरुवारी (ता. १७) दिली. त्यांच्यासोबत सहाय्यक अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माळी उपस्थित होते. (Dhule Vidhan Sabha Election 2024 Shirpur will vote at 336 centers)