SAKAL Exclusive : साक्री तालुक्यातील प्रकल्पांतील पाणीपातळी घटली; सरासरी केवळ 38 टक्के साठा शिल्लक

Dhule : यंदा भीषण दुष्काळाचे चटके आतापासूनच जाणवायला लागलेले असताना तालुक्यातील पाणी प्रकल्पातील घटती पातळीदेखील चिंताजनक आहे.
Sakri Kan riverbed has been dry for the last month due to lack of water.
Sakri Kan riverbed has been dry for the last month due to lack of water.esakal

Dhule News : यंदा भीषण दुष्काळाचे चटके आतापासूनच जाणवायला लागलेले असताना तालुक्यातील पाणी प्रकल्पातील घटती पातळीदेखील चिंताजनक आहे. सध्या तालुक्यातील तीन मध्यम व आठ लघु प्रकल्प मिळून एकत्रित सरासरी केवळ ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

यातील पाच लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून, आगामी काळात पाणी जपून वापरण्याची गरज आहे, अन्यथा भीषण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. (Water level in Sakri taluka decreased)

यंदा तालुक्यात मोसमी पाऊस न झाल्याने किमान परतीचा पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तोही पाऊस न झाल्याने नोव्हेंबरपासूनच पाण्याची निकड जाणवायला लागली होती. समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा नदी-नाल्यांना पूर तर नाहीच; परंतु पात्र दोन्ही काठ भरून पाणीदेखील वाहून गेलेले नाही.

अशातच सुरवातीच्या काळात झालेल्या थोड्याफार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्प तसेच लघु प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने तालुक्यातील शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याची या पाण्यावर भिस्त होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यातच या प्रकल्पातील घटता पाणीसाठा मात्र चिंता वाढविणार आहे.

केवळ ३८ टक्के साठा शिल्लक

तालुक्यात प्रमुख तीन मध्यम, तर आठ लघु प्रकल्प आहेत. यातील सध्या सर्वांत मोठा मध्यम प्रकल्प असणाऱ्या पांझरा अर्थात लाटीपाडा प्रकल्पात ४३ टक्के, जामखेली प्रकल्पात ४८ टक्के, तर मालनगाव प्रकल्पात ५७ टक्के साठा शिल्लक आहे.

Sakri Kan riverbed has been dry for the last month due to lack of water.
Dhule News : दांडीबहाद्दर मास्तरांवर होणार कारवाई; शिरपूर पंचायत समिती सभापतींचे निर्देश

लघु प्रकल्पातील शेलबारी प्रकल्पात १० टक्के, विरखेल प्रकल्पात ३१ टक्के, तर बुरुडखे प्रकल्पात ४१ टक्के साठा शिल्लक आहे. उर्वरित काबऱ्याखडक, बेहेड, शेवाळी, ककाणी, कायांकडा या पाच लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

या प्रकल्पापैकी सध्या पांझरा आणि जामखेली प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले असल्याने तेथील पाणीसाठा घटतो आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या उन्हामुळे बाष्पीभवनातूनदेखील यात घट होणार आहे.

मार्चनंतर तर स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता असून, आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन होऊन त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, अन्यथा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

"यंदा तुलनेत कमी झालेल्या पावसामुळे सर्वत्रच पाणीटंचाई स्थिती आहे. तथापि, सर्वांनीच याची जाणीव ठेवत उपलब्ध पाण्याचा काटेकोर आणि जपून वापर करावा. उपलब्ध पाण्याचे नियोजन करत टंचाई स्थिती निवारणासाठी प्रशासनाचेदेखील नियोजन सुरू आहे."-साहेबराव सोनवणे, तहसीलदार, साक्री

Sakri Kan riverbed has been dry for the last month due to lack of water.
Dhule News : धुळ्यात 5 दिवस महासंस्कृती महोत्सव : 26 फेब्रुवारीला उद्‍घाटन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com