धुळे- महापालिकेतर्फे शहरातील तीन भागांत वॉटर मीटर बसविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापैकी ज्या भागात आत्तापर्यंत नळजोडणीच नव्हती, अशा दोन भागांमध्ये प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, ज्यांनी घरपट्टी भरली, त्यांनाच वॉटरमीटरसह नळजोडणी देण्यात येत आहे. जे नागरिक घरपट्टी भरत नाहीत, त्यांचे वॉटरमीटरही ‘होल्ड’ करण्यात येत आहेत.