Dhule Water Scarcity : जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा 25 टक्के साठा; कडक उन्हामुळे जिवाची काहिली

Dhule News : कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत असून, धुळे जिल्ह्याचे तापमान ३९ अंशांपर्यंत पोचले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.
Dhule Water Scarcity
Dhule Water Scarcity esakal

सोनगीर : कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत असून, धुळे जिल्ह्याचे तापमान ३९ अंशांपर्यंत पोचले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील लघु व मध्यम पाण्याचा उपयुक्त साठा अवघा २५.१८ टक्के असून, तीन प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यात केवळ मृतसाठा असून, पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ४०.४८ टक्के जलसाठा होता. (Dhule Water Scarcity Only 25 percent stock in projects in district)

पाण्याची यंदाची ही स्थिती अतिशय बिकट असून, जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावे व पाड्यांना एप्रिलमध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल अशी स्थिती आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाई जाणवली नाही. यंदा मे व जूनमध्ये पाणीटंचाईची अवस्था भीषण असेल. मात्र राजकारणी लोकसभा निवडणुकीत व्यस्त आहेत. जनतेने पाणीटंचाईबाबत कोणाला साकडे घालावे, हा प्रश्न आहे.

दर वर्षी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना होत असल्याने वर्षानुवर्षे जनतेच्या नशिबी पाणीटंचाई पाचवीला पुजलेली आहे. दरम्यान, जामफळ प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याशिवाय धुळे व शिंदखेडा तालुक्यातील पाणीटंचाई दूर होणार नाही. जिल्ह्यात लघु व मध्यम प्रकल्पात सध्या १२४.६१ दशलक्ष घनमीटर एवढाच जलसाठा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात ११८.३२ दशलक्ष घनमीटर म्हणजे ६३.३६ टक्के म्हणजे बऱ्यापैकी जलसाठा आहे.

धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४. ८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. लघुप्रकल्पांची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्षघनमीटर एवढी असताना लघुप्रकल्पात अवघा १२.६५ दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ ११.१३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ४७१.४३ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १११.९६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३०.०२ टक्के जलसाठा आहे.

Dhule Water Scarcity
Dhule Water Scarcity : एप्रिलअखेरपर्यंत धुळेकरांना चौथ्या दिवशी पाणी; पाण्याच्या कमतरतेमुळे नियोजन

धुळे जिल्ह्यातील १२ प्रकल्पांपैकी सर्वांत जास्त ३४ दलघमी जलसाठा अनेर प्रकल्पात आहे. सर्वांत कमी म्हणजे शून्य दशलक्ष घनमीटर जलसाठा सोनवद, अमरावती व मुकटी प्रकल्पात आहे. बहुतांश लघुप्रकल्पांत अत्यल्प जलसाठा आहे. ४७ पैकी अवघ्या चारच लघुप्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे.

३४ लघु प्रकल्पांत १ ते ५० टक्के साठा असून, अनेक लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यांच्यात शून्य टक्के पाणी आहे. यंदा पावसाळ्यात सरासरीएवढा पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने यंदा प्रकल्प भरतील व शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा आहे.

Dhule Water Scarcity
Dhule Lok Sabha Election : काँग्रेसद्वयींच्या भांडणात भाजपचा लाभ! धुळे लोकसभा मतदारसंघात 42 वर्षांनी विजयी `एन्ट्री

आकडे बोलतात

(मोठे प्रकल्प, उपलब्ध जलसाठा व टक्केवारी यानुसार (आकडेवारी दलघमीमध्ये))

प्रकल्प जलसाठा टक्केवारी

१) पांझरा - ९.४९ २०.६३

२) मालनगाव -४.८३ ४२.६३

३ जामखेडी - ४.३८ ३५.४९

४) कनोली - १.५५ १८.३४

५) बुराई - १.२७ ९.९४

६) करवंद - ८.४६ ४६.३१

७) अनेर - ३४.०० ६९.०१

८) सोनवद - ०.०० ०.००

९) अमरावती -०.०० ०.००

१०) अक्कलपाडा -१६.०५ ३६.६७

११) वाडीशेवाडी - ०.३६ १.०६

१२) सुलवाडे - ३१.५७ ४८.५२

एकूण मध्यम प्रकल्पात - १११.९६ ३०.०२

एकूण लघु प्रकल्पात - १२.६५ ११.१३

एकूण जलसाठा- १२४.६१ २५.१८८

Dhule Water Scarcity
Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेसाठी कॉंग्रेसतर्फे 2 नवीन नावांची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com