Police officers and teams present during the investigation along with the wire theft gang.esakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule Crime News : तार चोरणारी टोळी गजाआड; 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Dhule Crime : महावितरण कंपनीच्या अॅल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीला येथील एलसीबीच्या पथकाने शिताफीने गजाआड केले.
धुळे ः दोंडाईचा (ता. शिंदखेडा) आणि शहादा (जि. नंदुरबार) येथे वीज महावितरण कंपनीच्या अॅल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीला येथील एलसीबीच्या पथकाने शिताफीने गजाआड केले. शहादा तालुक्यातील तिघांकडून सुमारे दहा लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत दहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. दोंडाईचा क्षेत्रातील रामी- पथारे रस्त्यावरील पाणीबाईनगरातील वखार महामंडळाजवळ महावितरण कंपनीचे दोन लोखंडी पोल व सिंगल फेज वायर चोरट्यांनी नेली. २० जुलैला सकाळी अकरापूर्वी ही चोरी झाली. याबाबत सहाय्यक अभियंता विवेक चौधरी यांच्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Wire stealing gang arrested with seizes 10 lakh worth of goods )