धुळे: कमी विद्यार्थिसंख्या असल्याने प्रतिकूल अहवाल देऊ नये, यासाठी महिला शिक्षणाधिकारीसह स्वतःसाठी दहा हजार रुपयांची लाच घेणारी धुळे पंचायत समितीची महिला शिक्षणविस्तार अधिकारी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. तिने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचेही नाव सांगितल्याने खळबळ उडाली आहे.