
धुळे : हद्दवाढ क्षेत्रात अडीच कोटी रुपये खर्चातून खडी-मुरमाचे रस्ते, चार कोटी ८४ लाखांतून धुळे महापालिकेत डाटा युनिफिकेशन करणे, अल्पसंख्याकबहुल नागरी क्षेत्रात पायाभूत सुविधेंतर्गत रस्ते, गटारी, पथदीप, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शासकीय मोकळ्या जागेला संरक्षक भिंत, मूलभूत सोयी-सुविधा विकास योजनेंतर्गत रस्ते, सभामंडप, पाइपलाईन, संरक्षक भिंत आदी सुमारे १५ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या कामांना स्थायी समितीने प्रशासकीय मंजुरी दिली. (Works worth 15 crore 58 lakhs approved in Sthayi)