Dhule ZP School : प्राथमिक शिक्षणाची उदासीनताच; 23 शाळा नादुरुस्त, 97 शिक्षकांची पदे रिक्त

ZP School : दुसरे शिक्षक नाहीत... हे सध्याचे उदासीन चित्र आहे, शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाचे.
Condition of roof and walls of Zilla Parishad Primary School.
Condition of roof and walls of Zilla Parishad Primary School.esakal

Dhule ZP School : जिल्हा परिषदेच्या १६९ प्राथमिक शाळांपैकी २३ शाळा नादुरुस्त... अन्य काही शाळाही काही प्रमाणात गळक्या... ९७ शिक्षकांची पदे अद्यापही रिक्त... पाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झालेल्या... मात्र त्यांच्या जागी अद्याप दुसरे शिक्षक नाहीत... हे सध्याचे उदासीन चित्र आहे, शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाचे. एकिकडे ही अशी स्थिती असताना मात्र दुसरीकडे नवे चिमुकले आणि त्यांचे आई-वडील शाळेच्या उत्सुकतेपोटी शाळा सुरू होण्याच्या आतुरतेत आहेत. ( 23 schools are in disrepair and 97 posts of teachers are vacant)

आपल्या पाल्याला शाळेच्या गोष्टी सांगून, शालेय साहीत्य खरेदी करून शैक्षणिक भवितव्याची स्वप्ने रंगवत आहेत. शिक्षण विभागस्तरावरही या नवोदितांचे जल्लोषात स्वागत करण्याचे नियोजन आहे. शिवाय शिक्षण विभागाने १०२ शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण सुरू केले आहे. पालकांचा कल आपल्या पाल्याला सेमी इंग्रजीमध्येच शिकविण्याकडे आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १६९ शाळा असून, त्यांपैकी २३ शाळांच्या दुरुस्तीची गरज आहे.

त्यासाठी जिल्हा परिषदेकडे तालुका शिक्षण विभागातर्फे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या लालफितीच्या कारभारात अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्य काही शाळांची किरकोळ दुरुस्ती व डागडुजीची गरज आहे. तेथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या मदतीने दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

शिक्षकांची रिक्त पदे

तालुक्यात एकूण ९७ रिक्त पदे आहेत. त्यात दोन मुख्याध्यापक, चार विषयशिक्षक, तर ९१ प्राथमिक शिक्षक आहेत. यात ते टेमलाय, गोविंदनगर, अक्कलकोस, आलाने, अजंदे खुर्द, होळ शाळा क्रमांक दोन, जातोडे मराठी शाळा, वेळोदे, विकवेल, वरूळ, कुरूकवाडे, लांघाणे, लोहगाव, वसमाने, कळगाव, कुंभारे, चौगाव खुर्द, चौगाव बुद्रुक, वडली, पावसानगर, चावळदे, सोडले, होळकरवाडी, दलवाडे प्र.सो. येथील शाळा़ंचा समावेश आहे. तालुक्यात पाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत, मात्र त्यांच्या जागी अन्य शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. (latest marathi news)

Condition of roof and walls of Zilla Parishad Primary School.
Nandurbar ZP School : कुठे आनंददायी शाळा, तर कुठे वर्गखोल्यांची दुरवस्था; नंदुरबार तालुक्यातील चित्र

विद्यार्थी स्वागत

दर वर्षाप्रमाणे याही वर्षी नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन आहे. वाजंत्री, गावातून प्रवेशदिंडी काढून पुष्पगुच्छ देऊन नवागतांचे स्वागत शाळेच्या पहिल्या दिवशी करण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन पूर्वतयारी झाली असून, १५ तारखेला पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

पाठ्यपुस्तकांचे होणार वाटप

तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या २४९ शाळांतील शासकीय, निमशासकीय विद्यार्थ्यांना ३३ हजार ३७३ मोफत पाठ्यपुस्तकांचे पहिल्या दिवशी वाटप करण्यात येणार आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकातच वही असणार आहे. त्यामुळे एकच पुस्तक विद्यार्थी शाळेत आणणार आहे. वर्षभरासाठी दरतिमाहीला एक अशी चार पुस्तके असणार आहेत.

''शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. आतापर्यंत १०२ सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या दिवसापासून गुणवत्तेत भर दिला जाईल.''-डॉ. सी. के. पाटील, गटशिक्षणाधिकारी, शिंदखेडा

Condition of roof and walls of Zilla Parishad Primary School.
Dhule ZP School News : ‘त्या’ 52 शाळांचे एकत्रीकरण बारगळणार; शालेय व्यवस्थापन समित्यांचा विरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com