धुळे: जिल्ह्यातील काही आश्रमशाळांमधील १३ विद्यार्थ्यांना गोवरची बाधा झाली आहे. यात एरंडोल (जि. जळगाव) येथील एक, धुळ्यातील तीन, तर नंदुरबारचे रहिवासी असलेल्या ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऐन पावसाळ्यात गोवर या आजाराने डोकेवर काढल्याने पुणेस्थित राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवेच्या उपसंचालकांनी येथील हिरे मेडिकलशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालय गाठले. त्यांनी ही संसर्गजन्य साथ वेळीच रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिली.