International Driving Permit
sakal
धुळे: उच्च शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. परदेशात गेल्यानंतर स्वतः वाहन चालवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आता प्रक्रिया सुलभ झाली आहे. यानुसार धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या सात महिन्यांत १२३ वाहनधारकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना प्रदान केला असून, यामुळे हे परवानाधारक जगातील १८४ हून अधिक देशांमध्ये बिनधास्त गाडी चालवू शकणार आहे.