धुळे- जनावरे विक्रीसाठी आणताना त्यांना ईअर टॅग लावणे बंधनकारक आहे. मात्र, धुळे बाजार समितीसह सर्वत्र विनाईअर टॅग जनावरांची अवैध विक्री होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडूनही काहीच कारवाई होत नाही. उलट पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह संबंधितांकडून बनावट ईअर टॅग व दाखले दिले जात असून, यात लाखोंचा गैरव्यवहार होत आहे. या सर्व प्रकाराला आळा घालून प्रत्येक विक्री होणाऱ्या जनावराला ईअर टॅग बंधनकारक करावा, त्यासाठी यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे केली.