धुळे- एमपीडीएखाली वर्षाचा तुरुंगवास भोगून परतलेल्या नरेश गवळी हा पुन्हा गुन्हा केल्यानंतर फरारी होता. देवपूर पोलिसांनी त्याला साथीदार ऋषभ शिरसाटसह ब्राह्मणगाव (ता. सटाणा) येथून अटक केली. न्यायालयाने दोघांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दोघेही धुळ्यातील नगावबारी परिसरातील रहिवासी असून, विविध पोलिस ठाण्यांत त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, दोघांना लपण्यासाठी सहकार्य करणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.