Municipal Election
sakal
शिरपूर: येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व राखत नगराध्यक्षपदासह ३१ जागांवर कमळ फुलविले. माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांचे पुत्र चिंतन पटेल १६ हजार ९५९ मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गुलाबराव पाटील यांचा पराभव केला.