
थोडक्यात:
नाशिकच्या दिंडोरी-कळवण रस्त्यावर बुधवारी रात्री 11:30 वाजता अल्टो कार आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, यात तीन महिला, तीन पुरुष आणि एका बालकाचा समावेश आहे.
अपघातानंतर कार रस्त्याकडेच्या नालीत पलटी होऊन लॉक झाल्याने आत अडकलेल्या लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संदीप मोगल
नाशिकमधील दिंडोरीमध्ये कार आणि बाईकचा भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी- कळवण रस्त्यावरील शिवनेरी हॉटेल व संस्कृती लॉन्स समोर बुधवारी रात्री 11.30 वाजता मोटरसायकल व अल्टो कारचा अपघात झाल्याची. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष व एका लहान बालकाचा समावेश आहे.