Dindori Lok Sabha 2024: दिंडोरीमध्ये जातीय समीकरणे निर्णायक; भारती पवार पुन्हा गड राखणार?

Dindori Lok Sabha 2024: मतदारसंघावर निर्मितीपासून भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यात भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण व डॉ.भारती पवार यांनी विजय मिळविला आहे.
Dindori Lok Sabha 2024
Dindori Lok Sabha 2024esakal

Dindori Lok Sabha 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोकणा, हिंदू महादेव कोळी, मराठा-कुणबी, वंजारी अधिक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत जातीय समीकरणे प्रभावी ठरलेली आहेत. पूर्वीचा मालेगाव मतदार संघ २००९ पासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आलेला आहे. यात दिंडोरी (पेठ), कळवण (सुरगाणा), नांदगाव, येवला, चांदवड (देवळा) व निफाड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघावर निर्मितीपासून भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यात भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण व डॉ.भारती पवार यांनी विजय मिळविला आहे.

२०१९ चे चित्र

डॉ. भारती पवार (भाजप) विजयी मते : ५,६७,४७०

जे. पी.गावित (माकपा) मते : १,०९,५७०

बापू बर्डे (वंचित बहुजन आघाडी) मते : ५८,८४७

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,९८,७७९

Dindori Lok Sabha 2024
Chandrapur Lok Sabha Constituency : मुनगंटीवार-धानोरकर यांच्यात थेट लढत

वर्चस्व

२००४ : भाजप

२०१४ : भाजप

२००९ : भाजप

२०१९ : भाजप

Dindori Lok Sabha 2024
Kalyan Lok Sabha 2024: कल्याणमध्ये शिवसेनेच्या गटांत रस्सीखेच; श्रीकांत शिंदेंच्या विरोधात मविआला तगडा उमेदवार मिळेना?

सद्य:स्थिती

केंद्रीय मंत्री व भाजपच्या डॉ. भारती पवार यांची उमेदवारी जाहीर, प्रचारात आघाडी

महाविकास आघाडीतील राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भास्कर भगरे व डॉ. भारती पवार यांच्या जाऊबाई जयश्री नितीन पवार यांच्या नावाची चर्चा सुरू.

डॉ. भारती पवार व जयश्री पवार या माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा आहेत.

माकपचे आमदार जीवा पांडू गावित हेदेखील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

Dindori Lok Sabha 2024
Kolhapur Lok Sabha 2024: कोल्हापुरात महायुतीसमोर आव्हान; मविआकडून श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी

हे मुद्दे प्रभावी ठरणार

आदिवासीबहुल असलेला हा मतदारसंघ आजतागायत विकासापासून वंचित

पिण्याच्या पाण्याची समस्या हा मतदारसंघातील जटिल प्रश्‍न आहे.

हंडाभर पाण्यासाठी महिलांना तासन्‌तास तिष्ठत बसावे लागते व रानोमाळ भटकंती करावी लागते.

Dindori Lok Sabha 2024
Parbhani Lok Sabha 2024: परभणीत मविआची सत्त्वपरीक्षा! भाजप, शिंदे गट व रासपत उमेदवारीवरून रस्सीखेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com