करंजवण-मनमाड जलवाहिनी योजनेसंदर्भात होणार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

मनमाड : शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात आज मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. उद्या (ता. 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनमाडचा पाणीप्रश्न नक्की सोडवू असे सकारात्मक आश्वासन महाजन यांनी दिले. 

मनमाड : शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात आज मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. उद्या (ता. 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनमाडचा पाणीप्रश्न नक्की सोडवू असे सकारात्मक आश्वासन महाजन यांनी दिले. 

मनमाडच्या पाणीप्रश्नाने अत्यंत गंभीर रूप धारण केले आहे. हजारो नागरिक पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेला तत्वतः मंजुरी देऊन पाणीप्रश्न मार्गी लावावा यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ सभापती मनीषा रत्नाकर पवार व त्यांचे पती भाजप नेते रत्नाकर पवार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आग्रह धरला होता. पालकमंत्र्यांनी तो पूर्ण केला. पवार दाम्पत्यांच्या मागणीनुसार 11 जूनला मंत्रालयात पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. करंजवण जलवाहिनी योजनेसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत विस्तृत चर्चा होऊन अडचणी समजावून घेण्यात आल्या. मनमाडचा पाणीप्रश्न तडीस लावू असे सकारात्मक आश्वासन महाजन यांनी देत खालील मुद्द्यांवर चर्चा चर्चा करण्यात आली. योजनेला येणारा अंदाजे खर्च 297 कोटी, त्यासाठी 15 टक्के मनमाड नगरपरिषद ब वर्ग असल्याने कशा पध्दतीने भरणार, 14 वा वित्त आयोग, सी. एस. आर. निधी, महाराष्ट्र शासनाकडुन सवलत यावर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वितरण व्यवस्थेसह प्रस्ताव सादर करण्यातबाबत महाजन यांनी सुचित केले. तर योजनेसंदर्भात या सर्व बाबीवर तोडगा काढण्यासाठी आज (ता 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याशी बैठक लावण्यात आली आहे.

त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे मनमाडकरांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्र्यांकडे पाणीप्रश्न गेल्याने यावर मंजुरीने नक्कीच शिक्कामोर्तब होईल असा आशावाद सव्वालाख नागरिकांनी व्यक्त केला सदर बैठकीला खासदार डॉ भारती पवार,जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ सभापती मनीषा रत्नाकर पवार, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार, नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, भाजप युवा नेता सचिन दराडे, शिवसेना नेते अल्ताफ खान, भाजपचे जिल्हाध्यहा दादा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जय फुलवाणी, भीमराव बिडगर, कांतीलाल लुनावत, मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर, नगरसेवक पिंटू शिरसाठ, विनय आहेर, नगरसेविका संगीता मगर, सविता गिडगे, सुरेखा मोरे, शाईन शेख, तसेच इतर नगरसेवक, नगरसेविका, मुख्य अभियंता, जलसंधारण विभाग, जिल्हाधिकारी, गा, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discussion about water pipeline karanjavan to Manmad with CM