जळगाव- जिल्हा प्रशासनाला २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी १३७ कोटी ९० लाख ३५ हजार रूपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट राज्य शासनाकडून देण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा तब्बल १६४ कोटी २३ लाख ६९ हजार रूपये वसूल केले. २६ कोटी ३३ लाख ५५ हजार रूपये उद्दिष्टापेक्षा सरासरी १९.१० टक्के अधिकचे जमीन महसूल व गौण खनिज वसुलीचे उद्दिष्ठ साध्य केले आहे.