Shivsena Executive : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी डॉ. गावित, मोरे, महाले यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde News

Shivsena Executive : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी डॉ. गावित, मोरे, महाले यांची नियुक्ती

धुळे : निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

त्यानुसार धुळे शहर व जिल्ह्यातील शिवसेनेची जबाबदारी डॉ. तुळशीराम गावित, मनोज मोरे, सतीश महाले, संजय गुजराथी, संजय वाल्हे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (district executive of Shiv Sena under leadership of Chief Minister Eknath Shinde has been announced dhule news)

शिवसेनेची कार्यकारिणी अशी : डॉ. तुळशीराम गावित-जिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र- साक्री व धुळे ग्रामीण), मनोज मोरे- जिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र-धुळे महानगर पूर्व व शिंदखेडा तालुका), सतीश महाले-जिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र धुळे महानगर पश्‍चिम व शिरपूर तालुका), संजय गुजराथी- महानगरप्रमुख (कार्यक्षेत्र-धुळे महानगर पूर्व),

संजय वाल्हे- महानगरप्रमुख (कार्यक्षेत्र- धुळे महानगर पश्‍चिम), शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर (स्व) आनंद दिघे यांची शिकवण याचा प्रचार आणि प्रसार कराल असा विश्‍वास तसेच, शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्‍वास कार्यकारिणी जाहीर करताना व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

या आशयाचे पत्र शिवसेना मध्यवर्ती पक्ष कार्यालय श्री भवानी चौक टेंभी नाका ठाणे येथील पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्राचे खनिकर्म व बंदरे मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे धुळे-नंदुरबारचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या मार्गदर्शनाने या नियुक्त्या केल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.