जळगाव- राज्य शासनाने नवे वाळू धोरण निश्चित केले आहे. राज्य व जिल्हा पर्यावरण समितीने मान्यता दिलेल्या जिल्ह्यातील २३ गटांमधून ९२ हजार १३५ ब्रास वाळूची उचल करण्यास मान्यता देण्यात आली. यातून जिल्हावासीयांना सुमारे ९२ हजार ९३७ ब्रास वाळूसाठा उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या ७ मेस ई-ऑक्शन होणार आहे.