Dhule News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाची धुळ्यात होळी; निष्ठावंतांची आरोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District Youth Army of shiv sena celebrate holi against Decisions of Election Commission dhule news

Dhule News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाची धुळ्यात होळी; निष्ठावंतांची आरोळी

धुळे : शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह या पक्षातील गद्दारांना देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाची जिल्हा युवा सेनेतर्फे सोमवारी (ता. ६) भगवा चौक परिसरात होळी करण्यात आली. त्या वेळी निवडणूक आयोगाविरोधात होळीची आरोळी देण्यात आली. (District Youth Army celebrate holi against Decisions of Election Commission about of shiv sena dhule news)

युवासेनेने पत्रकात म्हटले आहे, की सध्या भाजपप्रणीत केंद्र सरकार सर्वच स्वायत्त संस्थांचा स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी गैरवापर करीत आहे. वेळोवेळी ईडी, सीबीआय, एनआयए, एसीबी, नार्कोटिक्स ब्युरो अशा विविध स्वायत्त संस्थांचा वापर करून विरोधकांना संपविण्याचा डाव केंद्र सरकारने मांडला आहे.

त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह चोरून जनतेच्या मनाविरुद्ध निर्णय देऊन चाळीस गद्दारांना शरण जाणाऱ्या निवडणूक आयोगाचा जिल्हा युवा सेनेतर्फे होळी दहनातून निषेध करण्यात आला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

केंद्र सरकारचे भाडोत्री म्हणून निर्णय देणाऱ्या निवडणूक आयोगाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्ह मशालीने होळीद्वारे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या लढाईत निवडणूक आयोग तसेच चाळीस गद्दारांसह केंद्र सरकारचे दहनच होणार आहे, असा आशावाद जिल्हा युवा सेनेतर्फे व्यक्त करण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, युवती जिल्हा अधिकारी सोनी सोनार, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, नीलेश चौधरी, सागर मोरे, नितीन जडे, सिद्धेश नाशिककर, सोमेश कानकाटे, शुभम फुलपगारे, मनीष माळी, जयेश फुलपगारे, दादू मराठे, राजू धात्रक, आबा लोखंडे, समर्थ मुर्तडक, हर्शल साळुंखे, बाबा नाईक, ओम कानकाटे, भटू शेटे आदी उपस्थित होते.