Dhule News: ‘नार-पार’चे पाणी गिरणा खोऱ्यात वळवा; जल परिषदेतील सूर

While guiding the Jal Parishad, former MLA Prof. Sharad Patil. Neighbors Bhila Patil, Shubhangi Patil, Vikas Patil etc.
While guiding the Jal Parishad, former MLA Prof. Sharad Patil. Neighbors Bhila Patil, Shubhangi Patil, Vikas Patil etc.

Dhule News: खानदेशवासीयांनी पाणी प्रश्नावर जागरूक होणे काळाची गरज आहे. तापी, गिरणा आणि नार-पार खोरे हे तिन्ही खोरे म्हणजे ४०० टीएमसीहून अधिक पाणलोट व जलस्रोताचे क्षेत्र असून, हे खोरे उत्तर महाराष्ट्राची जीवनदायिनी ठरणार आहेत.

अतिवृष्टीच्या नार-पार खोऱ्यातील पाणी अतितुटीच्या गिरणा खोऱ्याकडे वळविणे हाच उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृद्ध करण्यासाठी प्रभावी व रामबाण उपाय ठरेल, असा ठाम विश्वास जलपरिषदेत व्यक्त झाला. (Divert water of Nari Par into girna valley opinion in Jal Parishad dhule news)

धुळे शहरातील केशरानंद उद्यानात उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेची एकदिवसीय जलपरिषद झाली. उपस्थित जलप्रेमींनी विविधांगी विकासाची भूमिका मांडली. जलपरिषदेचे अध्यक्ष विकास पाटील, बापू हटकर, माजी आमदार प्रा. शरद पाटील, मोतीलाल पोतदार, आर. एम. पाटील, सचिन भदाणे, जवाहर पाटील, जलअभ्यासक भिला पाटील, दीपक पाटील, सुभाष चौधरी, मगन सूर्यवंशी, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.

श्री. हटकर म्हणाले, की तापी खोऱ्याच्या सातपुडा डोंगररांगेतील सूर्यकन्या तापी, अरुणावती, अनेर, बोरी, वाघूर, उमरी, सुसरी व गोमाई या पश्चिम वाहिनी, तर गिरणा, पांझरा, मोसम, बुराई या पूर्ववाहिनी नद्या आहेत. पेठ- सुरगाणा अर्थात सह्याद्रीच्या डोंगररांगेतील नार-पार, तान, मान, औरंगा, अंबिका अशा १९ हून अधिक नद्या पश्चिम वाहिनी आहेत. त्यापैकी तापी खोरे हे खचदरीचे अर्थात खोलदरीचे खोरे आहे. गिरणा खोरे हे अतितुटीचे खोरे आहे आणि नार-पारचे खोरे हे अतिवृष्टीचे खोरे आहे.

अध्यक्ष पाटील म्हणाले, की उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून पुढील प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी देऊन लवकरात लवकर पुढील प्रकल्प पूर्ण करावेत. जेणेकरून उत्तर महाराष्ट्र (खानदेश) दुष्काळमुक्त होईल. यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.

While guiding the Jal Parishad, former MLA Prof. Sharad Patil. Neighbors Bhila Patil, Shubhangi Patil, Vikas Patil etc.
Dhule News : उत्पादन घटल्याने गरिबांची भाकर महागली; ज्वारी अडीच ते 5 हजार रुपये क्विंटल

जलपरिषदेतील महत्त्वपूर्ण ठराव

- पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा

- सुलवाडे जामफळ प्रकल्पाचे नामकरण प्रतापसागर करावे

- नार-पार योजनेत गिरणा, पांझरा, बोरी, मोसम नदीजोड प्रकल्प पूर्ण करावा

- हतनूर धरणावर डावा कालवा बांधावा

तिन्ही खोऱ्यांसाठी एकात्मिक नदीजोड प्रकल्पांतर्गत बारमाही मोठ्या नद्या लहान नद्यांना व लहान नद्या अतिलहान नद्यांना जोडल्यास कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त वा दुष्काळग्रस्त उत्तर महाराष्ट्रासाठी नवसंजीवनी देणारा हा प्रयोग ठरेल.

असे व्हावे जलव्यवस्थापनाचे नियोजन

नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागाची भाग्यरेषा असणाऱ्या नार-पार योजनेंतर्गत मांजरपाडा-१ प्रकल्प, वांजूळपाणी योजना, नार-पार-गिरणा नदी लिंक प्रकल्प जोडणे, जळगाव जिल्ह्यासाठी उर्ध्व तापी अर्थात हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी गाळ काढणे व उजव्या कालव्याप्रमाणे डाव्या कालव्याची बांधणी करणे, वरखेड-लोंढे, शेळगाव बॅरेज व सुलवाडे-जामफळचा समावेश बळीराजा संजीवनी प्रकल्पात करून अतिरिक्त हक्काच्या व हिश्श्याच्या पाण्यात सौर तंत्रज्ञान व बंदिस्त पाइपलाईनचा वापर करून कायमस्वरूपी रिझर्व्हरसची निर्मिती करणे, निम्न तापी प्रकल्प पाडळसरे, शेळगाव, सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजस प्रकल्पांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १४, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील २२, जल उपसा सिंचन योजनांसाठी सौर तंत्रज्ञानाचा, बंदिस्त पाइपलाईनचा आणि तुषार सिंचन व सूक्ष्म ठिबक संचाचा वापर केल्यास शून्य वीजबिल व शत प्रतिशत पाणीबचत होईल. शेकडो गावांची पाणीटंचाई दूर करणारे व भाग्यरेखा ठरणारे गिरणा नदीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सात बलून बंधाऱ्यांचे प्रकल्प पूर्ण करणे, तापी-बुराई नदीजोड प्रकल्पाचे अग्रक्रमाने कार्यान्वयन करणे.

While guiding the Jal Parishad, former MLA Prof. Sharad Patil. Neighbors Bhila Patil, Shubhangi Patil, Vikas Patil etc.
Dhule News : उत्पादन घटल्याने गरिबांची भाकर महागली; ज्वारी अडीच ते 5 हजार रुपये क्विंटल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com