उपनगर - आगामी काळात नाशिक महापालिकेबरोबरच विविध नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या मतदार नोंदणी प्रक्रिया, वॉर्डांची पुनर्रचना, आरक्षण नियोजन, तसेच नगरसेवकांची संख्या याबाबतचे निश्चितीकरण जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ९७ लाख पाच हजार ६३९ मतदार नोंदविले गेले असून, या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.