Nagar Parishad
sakal
दोंडाईचा: येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षांसह सात नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपच्या नयनकुंवर रावल बिनविरोध झाल्या; तर भाजपचे सात नगरसेवकही बिनविरोध निवडणून आले आहेत. मंगळवारी (ता. १८) अर्ज छाननीदरम्यान नाट्यमय घडामोडीनंतर भाजपने पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात इतिहास घडविला आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री चौथ्यांदा नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, घोषणा देत मोठा जल्लोष केला गेला.