दोंडाईचा- राणीपुरा होळी चौकातून पल्सर मोटारसायकल चोरी झाली होती. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिस मागावर होते. दीड दिवसांतच पल्सर दुचाकीसह सृष्टी गार्डनमध्ये काटेरी झुडपात लपविलेल्या अन्य चार मोटारसायकलीसह डीबी पथकाने एका चोरट्यास पकडले आहे. एकूण दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामुळे मोटारसायकल चोरट्यांना या कारवाईमुळे धडकी भरली आहे.