नंदुरबार- मंदिराचे पावित्र्य टिकून राहावे, मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत, मंदिरातून अहिंदूंना व्यापारासाठी प्रवेशबंदी करण्यात यावी, मंदिरे सरकारने नव्हे तर भक्तांनी चालवावीत, मंदिरांचे संघटन व्हावे, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात सहभागी मंदिर प्रमुखांनी एकमताने मंदिरात वस्त्र संहिता अर्थात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याला आरंभ करण्यात येणार आहे.