गॅस कंटेनरच्या धडकेत चालकाचा मृत्यू 

प्रमोद पवार
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

कजगाव : भोरटेक (ता. भडगाव) जवळील तिहेरी वाहन अपघातात कंटेनरच्या धडकेने पिकअप चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली.रसत्याचे चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

कजगाव : भोरटेक (ता. भडगाव) जवळील तिहेरी वाहन अपघातात कंटेनरच्या धडकेने पिकअप चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली.रसत्याचे चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

चाळीसगाव हून भडगाव कडे भरधाव वेगाने येणारा कंटेनर  क्रमांक एम एच 19 झेड 4635 या वाहनाने चाळीसगाव कडे केळी माल घेऊन  जाणारी मालवाहू पिक अप एम एच 07 4671 या वाहनाला जोरदार धडक दिल्याने युनूस बेग मोहम्मद बेग (वय 65 रा. निंबाळे ता. संगमनेर जि. अहमदनगर) या चालकाला डोक्याला व पायाला मार लागला व गंभीर जखमी झाला होता. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.चाळीसगाव रेगे  उपचारासाठी नेले असता उपचार दरम्यान चालकाचा मुत्यू झाला. या अपघात मुळे पिक अप गाडीच्या मागून येणारी बोलेनो कंपनीची कार एम एच 20 ई ई 8306 या कारने पण धडक दिली. परंतु गाडीतील एअर बॅग उघडल्याने पुढील अनर्थ टळला तरी या गाडीतील ईशान योगेश परदेशी (वय 7) या लहान मुलगा किरकोळ जखमी झाला होता दरम्यान हा अपघात एवढा भीषण होता कि मृत युनूस बेग हे गाडीत दबल्या गेले मुळे क्रेन च्या साहाय्याने गाडीचा पुढचा भाग काढून बाहेर काढले होते. 

108 क्रमांक रूग्नवाहीकेची असंवेदनशिलता 
दरम्यान अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी यूनूस बेग याला गाडीच्या बाहेर काढून रस्ताच्या बाजूला नेले तेव्हा पायाला व डोक्याला मार लागल्याने नागरिकांनी 108 रूग्णवाहीकेला फोन करून चाळीसगाव येथे उपचारासाठी नेण्यासाठी बोलावले परंतु कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा तील वाहन नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले पर्यायी व्यवस्था म्हणून नगरदेवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्ण वाहीका बोलावली परंतु जवळपास एक दिड तास उशिरा आली मुळे  यूनूस बेग गंभीर जखमी अवस्थेत रस्तावरच पडून होते यामुळे रक्तस्ञाव जास्त झाला जर ही रूग्ण वाहीका लवकर आली असती तर कदाचित मृत्यू ची घटना टळली असती यामुळे उपस्थित नागरिकांनी 108 क्रमांक च्या रूग्णवाहीका ची  असंवेदनशील पणा बाबत नाराजी व्यक्त करीत होते.

Web Title: driver dies in accident of container