Dhule Accident News : पनाखेडनजीक ट्रक उलटला; चालक गंभीर

An overturned truck full of tomatoes near Garbardi Phata. In the second photo, a truck hit a container from behind near Bhillat Baba Mandir near Palas.
An overturned truck full of tomatoes near Garbardi Phata. In the second photo, a truck hit a container from behind near Bhillat Baba Mandir near Palas.esakal

Dhule Accident News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाची गेल्या वर्षभरात खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. महार्गावर दोन्ही बाजूस तब्बल चार ते पाच फूट लांबी-रुंदी आणि फूट-दोन फूट खोलीच्या खड्ड्यांनी रस्ता व्यापला आहे.

हे खड्डे टाळून प्रवास होऊच शकत नसल्याने शिरपूर-पळासनेरदरम्यान अपघातांची मालिकाच सुरू आहे.(Driver injured due to overturned truck dhule accident news)

तालुक्यातील पनाखेडनजिक असलेल्या गारबर्डी फाट्याजवळ ट्रक उलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी सहाला घडली व त्याच दिवशी पळासनेरनजिक भिल्लट बाबा मंदिरजवळ दुपारी तीनला दुसरा अपघात झाला. अपघातानंतर सांगवी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सांगवी पोलिसांत दोन्ही अपघातांची नोंद झाली आहे.

धुळे येथून टोमॅटो भरून सेंधव्याकडे भरधाव निघालेला ट्रक (आरजे ११, जीसी ५४४१) पनाखेड शिवारात गारबर्डी फाट्यानजीक पोचला असता खड्डे टाळताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला.

अपघातात ट्रकचालक वाहनाखाली दाबला गेल्याने गंभीर जखमी झाला, असे त्याच्या साथीदाराने सांगितले. तसेच ट्रक (एमपी ३३, एच ७७०७) पळासनेरनजीक भिल्लड बाबा मंदिराजवळ गतिरोधकाजवळ कंटेनरला मागून धडकल्याने ट्रकचालकाचे पाय दाबले गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच सांगवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

An overturned truck full of tomatoes near Garbardi Phata. In the second photo, a truck hit a container from behind near Bhillat Baba Mandir near Palas.
Dhule Accident News : नेरला भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालकासह मुलगी जागीच ठार

दोन्ही चालकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातांना जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे. रस्त्यावरील अपघातांची वारंवारिता डोळे विस्फारण्यास भाग पाडणारी ठरत आहे. रोज सरासरी दोन-तीन लहान-मोठे अपघात होत आहेत.

यातही दुचाकींच्या अपघातांची संख्या अधिक आहे. वाहनधारकांकडून रोजचा लाखो रुपयांचा टोल वसूल केला जात असताना खड्डे बुजविण्याचे काम सुरू न झाल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणेने खड्डे बुजवून महामार्गाची त्वरित दुरस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महामार्गावरील दहिवद, सांगवी, पनाखेड, पळासनेर गावांतील ग्रामस्थासंह वाहनधारकांनी दिला आहे.

''महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनांची खराबी होते. त्यामुळे पैसा व वेळ वाया जातो खड्डे टाळण्यासाठी काही वेळा वाहनावरचा ताबा सुटतो. अपघाताला सामोरे जावे लागते.''-अशोक गवळी, वाहनचालक, मालेगाव .

An overturned truck full of tomatoes near Garbardi Phata. In the second photo, a truck hit a container from behind near Bhillat Baba Mandir near Palas.
Dhule Accident News : सोनगीर येथे आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com