माळमाथ्यासह दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा : महावीर जैन

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पिण्याच्या पाण्याबरोबरच पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पशुधनाचे पालनपोषण व संवर्धन करणे अवघड झाले आहे. शासनाने माळमाथा परिसरात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चाऱ्यासाठी थेट अनुदान द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे साक्री तालुका उपप्रमुख महावीर जैन यांनी केली आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला असून अशा भयानक परिस्थीतीत शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात टाळाटाळ करीत आहे.

पिण्याच्या पाण्याबरोबरच पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पशुधनाचे पालनपोषण व संवर्धन करणे अवघड झाले आहे. शासनाने माळमाथा परिसरात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चाऱ्यासाठी थेट अनुदान द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे साक्री तालुका उपप्रमुख महावीर जैन यांनी केली आहे.

यंदा माळमाथा परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणी टंचाईने बहुतांशी गावांवर दुष्काळाची गडद छाया आहे. पाण्याअभावी शेतातली पीके करपली असून येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उदभवण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाने धुळे जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी जाहीर केले असून तालुक्यातील उर्वरीत भाग दुष्काळी यादीत समावेश झाल्याची घोषणा केली आहे. पण दुसाणे सर्कल अद्याप दुष्काळाच्या यादीत नसल्याने दुसाणे सर्कलमधील गावांना दुष्काळी यादीत सामावून घ्यावे व पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी छावण्या सुरु कराव्यात, अशी मागणी बळसाणे येथील शिवसेना तालुका उपप्रमुख महावीर जैन यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drought affected area fodder Mahavir Jain