जळगाव/भुसावळ- येथील शाहूनगर पडकी शाळेजवळील सरफराज भिस्ती याच्या घरात पाच लाख ३४ हजार रुपयांचे एमडी ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणी आणखी तीन ‘ड्रग्ज पेडलर’ला अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने शनिवारी (ता. ३) संशयितांचा पाठलाग करून अटक केली.