
चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील महामार्ग पोलिसांनी गुरुवारी (ता. २४) पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणातील संशयित कारचालकाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील इतर संशयितांच्या शोधासाठी शहर पोलिसांची तीन पथके नियुक्त केली असून, लवकरच यातील मुख्य संशयिताचा शोध घेतला जाईल, असे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी सांगितले.