Dhule Drought News : पावसाच्या दडीने ग्रामीण बाजारात शुकशुकाट; मजुरांच्या हाती ना काम ना पैसा

Due to lack of rain, the growth is stunted and maize is suffering due to fall of worms.
Due to lack of rain, the growth is stunted and maize is suffering due to fall of worms. esakal

Dhule Drought News : जवळपास महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. शेतातील पिके कोमेजू लागली आहेत. निंदणी, मशागतीची सारीच कामे ठप्प झाली आहेत. पाऊसच नसल्याने शेतात कामेच उरलेली नाहीत. पावसाच्या आगमनाने शेतातील कामे वाढतात. तसे मजुरांच्या हाताला कामही मिळते.

दोन पैसे हाती खेळूही लागतात. पावसाअभावी मजुरांना ना काम आहे ना हाती पैसा. याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला आहे.

ग्रामीण बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवत आहे. केवळ मजुरीवर गुजराण करणारी कुटुंबे चिंताग्रस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचीही हीच अवस्था झाली आहे. (Due to lack of rain laborers have no work and money dhule drought news)

याले काय श्रावण म्हन्तस..!

अधिक श्रावण संपल्यानंतर निज श्रावण सुरू आहे. श्रावण म्हटला म्हणजे-

श्रावणमासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येती सरसर शिरवे

क्षणात ऊन पडे

असे बालकवींनी सार्थक वर्णन श्रावणाचे करून ठेवले आहे. मात्र या श्रावणात उन्हाने काहिली होत आहे. आकाशात ढग येताहेत अन् निघूनही जाताहेत. श्रावणात खळखळ वाहणारे नदी-नाले कोरडे पडलेले आहेत.

गावातच काय शेतातही फफुटा उडत आहे. शेतकरी, शेतमजूर सारेच पावसाची चातकासम वाट बघत आहेत. आज पाऊस येईल, या आशेने दिवसामागून दिवस निघून जाताहेत. ते मनात कुढत म्हणताहेत,

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Due to lack of rain, the growth is stunted and maize is suffering due to fall of worms.
Eknath Khadse News : दुष्काळ तोंडावर... कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा : एकनाथ खडसे

पावसायामा पाणी नयी

उन पडी ऱ्हायनं

देखीसन पिकेस्ले

मन मन्ह रडी ऱ्हायनं

बाजारपेठा मंदावल्या

जिल्ह्यात सोनगीर, कापडणे, लामकानी, कुसुंबा, आर्वी, मुकटी, फागणे, नेर, नरडाणा, दोंडाईचा, शिंदखेडा, चिमठाणे, शिरपूर, बोराडी, सांगवी, अर्थे, थाळनेर, पिंपळनेर, साक्री, म्हसदी, निजामपूर, जैताणे व दहिवद येथील बाजारपेठा ग्रामीण जीवनाशी निगडित आहेत. येथील उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. लाखोंची उलाढाल हजारांवर आली आहे. भाजीपाला बाजाराची उलाढालही मंदावली आहे.

आदिवासी मजूर परतीच्या मार्गावर

धुळे व शिंदखेडा तालुक्यात मध्य प्रदेशमधील सातपुड्यातील आदिवासी मजूर मोठ्या प्रमाणात शेती शिवारात स्थायिक झाले आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने उपासमार होऊ लागलीय. त्यांना शेतीमालकही उचल देण्यास तयार नाहीत. बागायतदारांकडील मजूर सोडल्यास, इतर मजूर येत्या आठ दिवसांत पाऊस न आल्यास गावी परतण्याच्या विचारात आहेत.

समुद्र शांत कसा?

दर वर्षी ऑगस्टमध्ये समुद्रावरील वारे तीव्र होतात. समुद्राला मोठे उधाणही सुरू असते. सध्या तर खवळणारा समुद्रही शांत दिसत आहे. एक वेगळेच संकेत मिळत असल्याचे मुंबईस्थित ग्रामीण युवकांनी सांगितले.

Due to lack of rain, the growth is stunted and maize is suffering due to fall of worms.
Maharashtra Rain Update : राज्यात यंदा 27 टक्के पाऊस कमी; धरणसाठाही 20 टक्के मागेच

परिणाम

-चाराटंचाई

-बैलजोडी विक्री वाढली. भाव मिळेना

-पोळ्यावर सावट

-विवाह, सोने-चांदी बाजार, कपडे बाजार, मंडप व्यवसायापवर परिणाम

घरबांधणी, वाहने, नोकरी, बेरोजगारी, स्थलांतर

उपाययोजना

-जल पुनर्भरण

-जंगल संवर्धन

-चर खोदणे

-वृक्षारोपण

-तापी पाणी अडविले, पुढे काय?

-सुलवडे-जामफळ योजना

-लामकानी पॅटर्न अंमलबजावणी

-शाश्वत विकास-अक्कलपाडा चाऱ्या

Due to lack of rain, the growth is stunted and maize is suffering due to fall of worms.
Dhule Drought News : आयी कपाशी कईन वाढी; कयीन येचसूत..! ताटमा दुष्काळ वाढीलशेनी जाणीव...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com