कापडणे- बाजारात ढेमशांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ढेमशांचे दर प्रतिकिलो पाचपर्यंत आले आहेत. मोठ्या आशेने इंदूरच्या बाजारात नेलेली ढेमसे विक्री न करताच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तेथील गोशाळेतील गायींसाठी ढेमसे पाठविली जात आहेत. काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून मोठी निराशा व्यक्त होत आहे.