
ग्रामीण भागात अशा स्वरूपाचा पहिला धक्का असल्याने सर्वांच्या चेहर्यावर भीतीचे सावट निर्माण झाल्या.
वडाळी : भूकंपाचा अचानक धक्का बसल्याने जयनगर सहा परिसरातील अनेक मातीच्या घराच्या भिंतींना तडे गेले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या तोंडी भूकंपाची चर्चा सुरू आहे.
संबधीत बातमी- शहादा परिसरात भूकंपाचा धक्का; मध्यप्रदेशात केंद्र
शनिवार (आज) 01:24 दुपारी अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागले. त्यामुळे नागरिकांमध्ये अचानक धावपळ होवून घराबाहेर येऊन एकमेकांना काय झाले याबाबत विचारणा करुन लागेल. यात प्रत्येक जण भूकंप झाल्याचे सांगत होते ग्रामीण भागात अशा स्वरूपाचा पहिला धक्का असल्याने सर्वांच्या चेहर्यावर भीतीचे सावट निर्माण झाल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील गावाच्या कच्च्या मातीच्या घराच्या भिंतींना तडे गेले आहेत
अन् किल्लारी गावाची झाली आठवण
30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी येथे भूकंप होऊन मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी झाली या भूकंपामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते या भूकंपात माणसे व जनावरे जमिनीत गाडले गेले होते अशी परिस्थिती त्यावेळी भूकंपामुळे निर्माण झाले होते आणि त्याच त्यात भूकंपाची आठवण आज परिसरातील ग्रामस्थांना झाले अचानक जमिनीला हैदरा असल्याने अनेकानेक घराबाहेर पळ काढला बाहेर येऊन प्रत्यक्ष एकमेकांची विचारपूस करू लागले तुम्हाला काय हालचाल झाल्याचे जाणवले का जो तो आपल्या तोंडून भूकंप झाल्याचे सांगत होता.
आवश्य वाचा- हाडे गोठावणारी थंडीत साहसी तरुणांनी पाच दिवसातचं हिमालयातील "संदकफू" शिखर केले पार
मध्यप्रदेश अवघ्या तीस किलोमीटर
आज झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल असल्याने केंद्र शहादा येथील सावळदे आहे मध्य प्रदेशात या भूकंपाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवल्याचे दिसून आले असून मध्यप्रदेशात लगतचा परिसराचा भाग आयात जयनगर कोंढावळ वडाळी या परिसरापासून मध्यप्रदेश अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे भूकंपाची झटके या ठिकाणी तीव्र स्वरूपात जाणवले
वाचा- कोरोना संकटातही शहापूरच्या शेतकऱ्याने एकरी चार लाखाचे मिळवीले उत्पन्न
एक वाजेच्या सुमारास पायाखालच्या जमिनीचे हालचाल सुरू झाली अचानक झटका आवाज आल्याचे लक्षात आले शेतातील मजुरांची देखील पळापळ सुरू झाली अचानक झालेल्या भूकंपामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
- विश्वनाथ पाटील शेतकरी जयनगर
संपादन- भूषण श्रीखंडे