रोहिणी खडसे यांच्या पराभवावर एकनाथ खडसे म्हणाले... | Election Results 2019

टीम ई-सकाळ
Thursday, 24 October 2019

मला तिकीट द्या सांगितलं होतं

- राष्ट्रवादीशी लढा देतोय 

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिवसेना-राष्ट्रवादीची छुपी युती होती. या साऱ्या गोष्टींची मला जाणीव होती. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. पण यश आले नाही. आता पराभवाची कारणे शोधावी लागतील, असे ते म्हणाले.

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला तर रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. एकनाथ खडसे म्हणाले, मतदारसंघात कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. पण यश आले नाही. शिवसेना-राष्ट्रवादीची छुपी युती होती. या साऱ्या गोष्टींची मला जाणीव होती. त्यामुळेच पराभव झाला. पराभवाची कारणे आता शोधावी लागतील. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार होते तरी त्यांनी पक्षातून काढले नाही. जिद्दीने काम केले. मात्र, त्याला यश आले नाही आणि पराभव झाला. 

मला तिकीट द्या सांगितलं होतं

रोहिणीला तिकीट न देता मला तिकिट द्या, असे मी
नेतृत्त्वाला सांगितलं होतं. पण असं झालं नाही. हा निसटता पराभव आहे, मोठा पराभव नाही. मागील निवडणुकीतही अशाप्रकारचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी मी असल्यामुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यावेळी त्यांचा पाठिंबा
हा शिवसेनेला होता.

राष्ट्रवादीशी लढा देतोय 

राष्ट्रवादीशी मी लढा देत आहे. मी त्यांचा पराभव करूनच निवडून येत आहे. जिल्ह्यात भाजपचे काम केले. भाजप या जिल्ह्यात नाहीतर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse gives Statement After Defeated Rohini Khadse