मुक्ताईनगर- विधानसभेत गाजलेल्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अधिकारी नव्हे, तर राजकारणी असल्याचा गौप्यस्फोट विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांना ‘पॉक्सो’अंतर्गत झालेली अटक ही धक्कादायक घटना आहे. त्यामुळे याची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी. तसेच ‘हनी ट्रॅप’पेक्षा वेगळे प्रकरण आहे. यात अधिकारी नव्हे, तर राजकारणी असल्याचा सनसनाटी आरोप करून आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे.