esakal | Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'राज्यात महाआघाडीचे सरकार येणार'
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse started campaigning from Raver for assembly Election

दसर्‍याच्या मुहूर्तावर रावेर येथे प्रचार नारळ वाढवताना राज्यात सरकार महाआघाडीचेच येणार, असे म्हटले पण झालेली चूक त्यांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी ती सावरताना पुन्हा राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे सांगितले.

Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'राज्यात महाआघाडीचे सरकार येणार'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रावेर (जळगाव): दसर्‍याच्या मुहूर्तावर रावेर येथे प्रचार नारळ वाढवताना राज्यात सरकार महाआघाडीचेच येणार, असे म्हटले पण झालेली चूक त्यांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी ती सावरताना पुन्हा राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे सांगितले.

खडसे म्हणाले की, आमच्याकडे ते नाथाभाऊंला पाडण्यासाठी आघाड्या बिघाड्या सुरू आहेत ना! त्यामुळे महाआघाडी चुकून तोंडात आलं, असे म्हणत राज्यात महायुतीचेच राज्य येणार, असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार रक्षा खडसे, उमेदवार हरिभाऊ जावळे उपस्थित होते.

खडसे म्हणाले, बरेच रामायण घडले. महाभारताचाही पहिला अध्यायही आटोपला. मात्र नाथाभाऊ भाजपमध्येच आहे. आता सब मिलके आओ और नाथाभाऊंको गिराओ.. म्हणून आघाड्या बिघाड्या सुरू आहेत. अरे हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे. रणांगणातून बाहेर निघणं चांगले जाणतो. तो कधी अडकणार नाही. मिल गया तो मिल गया नही तो छोड दिया. तीर लगा तो ठीक है. नही तो कमान अपने पास है. असा विरोधकांचा समाचार घेत, सर्व समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी आपण लढत आहे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

loading image