तरुणांना लाजवणारा उत्साहाचा झरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नाशिक - गात्रे शिथिल झालेली असतानाही 25 वर्षांच्या तरुणाला लाजवेल असा उत्साह घेऊन गावागावात प्रकाशाचे दीप लावणारे पाडूरंग चव्हाण फलोत्पादन परिषदेला हजेरी लावणारे सर्वात वयस्कर शेतकरी ठरले आहेत. महापरिषदेनंतर तातडीने गावी जाऊन शेतकऱ्यांचा समूह तयार करुन त्यांची कंपनी स्थापन करण्याचा मानस त्यांनी मोठ्या उत्साहाने व्यक्त केला. 

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालूक्‍यातील शेलू गावाचे रहिवासी असलेले चव्हाण यांनी शेतीत बरेच चढ-उतार पाहिले आहेत. वयाच्या साठीनंतर त्यांनी आधुनिकतेची कास धरत शेती पिकवण्यास सुरुवात केली. 25 एकर शेतीत ते आधुनिक पध्दतीने शिमला मिरची, काकडी आणि टॉमेटोची पीके घेतात. त्यासाठी त्यांनी शेतात 150 बाय 150 असे शेत तळे बांधले आहे. फलोत्पादन महापरिषदेला आलेल्यांपैकी ते सर्वात वयस्कर शेतकरी ठरले. सहावीत असताना फी भरली नाही म्हणून त्यांच्या हातात दाखला ठेवण्यात आला तेव्हापासून ते गरजू विद्यार्थ्यांना पदरमोड करुन मदत करतात. एवढेच नव्हे तर त्यांनी ग्रामिण भागातल्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करता यावा यासाठी 217 अभ्यासिका बांधून तिथे सौर दिव्यांचा प्रकाश पाडला. त्यासाठी 40 लाखांचा खर्च झाला. या सर्व गावात त्यांनी सौर उर्जेवर चालणारे पथदिवे लावून गावे उजळवली आहेत. पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांचा सहवास लाभलेल्या चव्हाण यांनी "गल्ली ते गल्ली व्हया दिल्ली' पुस्तक पूर्ण केले. 

ग्वाल्हेर येथे वार लावून जेवणाऱ्या चव्हाण यांनी बी.ई. (सिव्हील) पूर्ण केल्यानंतर शेती आणि त्यास पुरक व्यवसाय सुरु केला. शेतीसाठी कमी खर्चातले संरक्षक खांब, पाण्याच्या टाक्‍या ते तयार करुन देतात. या वयातही ते प्रत्येक दिवशी जवळपास 40 किलोमीटर प्रवास करतात. फलोत्पादन महापरिषदेनंतर शेतकऱ्यांचा समूह करुन त्यांची कंपनी काढण्याचे काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The elderly farmer pandhurang chavan