शिरपूर तालुक्यात अग्नी तांडव; वृद्ध महिलेसह 4 जनावरांचा मृत्यू

एक तास चाललेले हे अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
Fire
Fireesakal

बभळाज : अजनाड बंगला (ता. शिरपूर) येथे नागेश्वर रस्त्यालगत हनुमान मंदिरासमोर लागून असलेल्या घराला शनिवारी (ता.२८) दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान आग लागली. यात साठ वर्षीय वृद्ध महिलेसह चार जनावरांचा होरपळून मृत्यू तर एक जखमी झाला. तसेच दोन मोटरसायकली व जनावरांच्या चारासह संपूर्ण घर जळून खाक झाले. एक तास चाललेले हे अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात येत नसल्यामुळे अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आली.

नागेश्वर रस्त्यालगत कैलास बाबू चव्हाण यांचे कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्या घराच्या पाठीमागे गुरांचा गोठा असून तेथे गुरांसाठी साठविण्यात आलेल्या चाऱ्याला दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान अचानक आग लागली. आगीने अचानक रौद्र रूप धारण केले व हवेमुळे ही आग हळूहळू आजूबाजूतील घराजवळ ही पसरली. आगीत चार जनावरांसह नवसीबाई बाबू चव्‍हाण (वय ६०)या वृद्धेचा होरपळून मृत्यू झाला तर कैलास चव्‍हाण हे जखमी झाले. आगीत कैलास चव्हाण यांची ८६ हजार रुपये किमतीची प्लॅटिना व १५ हजार रुपये किमतीची सुझुकी मोटारसायकलसह संपूर्ण घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेने चव्‍हाण कुटुंब उघड्यावर आले आहे.

Fire
देशीचे गोदाम फोडून विदेशीवर उडवला पैसा; चोरट्यांची टोळी गजाआड

आगीत कैलास चव्हाण यांचे दोन जनावरे तर सोमा महाळु ठेलारी यांचे दोन बैलांचा देखिल होरपळून मृत्यू तर गोरख लालचंद बंजारा, कैलास चव्हाण व सोमा ठेलारी या तिघांचा प्रत्येकी पन्नास हजाराचा गुरांचा चारा जळून खाक झाला. तसेच कैलास चव्हाण यांचे भुईमुगाच्या शेंगा विकून घरात ठेवलेले रोख ६४ हजार रुपये, नवनाथ सोमा ठेलारी यांच्या साडेपाच क्‍विंटल भुईमुगाच्या शेंगाही जळून खाक झाल्या. आगीत अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून तलाठी सानप यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच दरबार जाधव, संतोष जाधव, सोमा शिंदे, किशोर जाधव, गोविंदा राठोड, पोलिस पाटील आदी उपस्थित होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून थाळनेर पोलिसात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.

Fire
विवाहाचे आमिष दाखवून वरपित्याची फसवणूक; वधूसह 2 जणांविरोधात गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com