नाशिकमध्ये राष्ट्रवादी अन्‌ भाजपमध्ये तगडी लढत  | Election Results 2019

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 24 October 2019

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता दोन तास झाले असून शहर-जिल्ह्यातील 15 मतदारसंघातून राष्ट्रवादी अन्‌ भाजपमध्ये तगडी लढत आहे. राष्ट्रवादीचे "आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळांनी आघाडी घेतली असली, तरीही त्यांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आघाडी घेतली आहे. 

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता दोन तास झाले असून शहर-जिल्ह्यातील 15 मतदारसंघातून राष्ट्रवादी अन्‌ भाजपमध्ये तगडी लढत आहे. राष्ट्रवादीचे "आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळांनी आघाडी घेतली असली, तरीही त्यांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आघाडी घेतली आहे. 

तीनही मतदारसंघातून भाजपची आघाडी कायम 
नाशिकमधील तीनही मतदारसंघातून भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे. नाशिक पूर्वमधून मनसेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झालेले ऍड्‌. राहूल ढिकले, नाशिक मध्य मधून भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पश्‍चिममधून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी आघाडी घेतली आहे. मात्र शिवसेनेच्यादृष्टीने धक्कादायक बाब म्हणजे, माजीमंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र आमदार योगेश घोलप यांच्याविरुद्ध भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेशकर्त्या झालेल्या सरोज अहिरे यांनी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या उमेदवारी करणाऱ्या निर्मलाताई गावीत यांना इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरमधून कॉंग्रेसचे हिरामण खोसकर यांनी मागे टाकले आहे. मालेगाव मध्य मधून कॉंग्रेसचे आमदार आसिफ शेख हे मागे पडले आहेत. इथून एम. आय. एम. चे मौलाना मुफ्ती ईस्माईल यांनी आघाडी घेतली आहे. 

बागलाणमधून राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्याविरुद्ध भाजपचे दिलीप बोरसे यांनी दहा हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. निफाडमधून हॅट्‌ट्रीकची तयारी केलेले शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांना राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी मागे टाकले आहे. सिन्नरमधून शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादीचे ऍड्‌. माणिकराव कोकाटे यांच्यात काट्याची लढत सुरु आहे. ऍड्‌. कोकाटे यांनी आघाडी घेतली होती. चांदवडमधून भाजपचे आमदार डॉ. राहूल आहेर यांनी कॉंग्रेसचे शिरीष कोतवाल यांच्यावर सात हजार मतांनी आघाडी घेतली आहे. कळवण-सुरगाणामधून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावीत हे आघाडीवर आहेत. दिंडोरी-पेठमधून राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी मोठी आघाडी घेतली आहे. 
... 
आघाडीची पक्षनिहाय सध्यस्थिती 
भाजप : नाशिक मध्य-प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पूर्व-ऍड्‌. राहूल ढिकले, नाशिक पश्‍चिम-सीमा हिरे, चांदवड-देवळा-डॉ. राहूल आहेर, बागलाण-दिलीप बोरसे 
राष्ट्रवादी : येवला-छगन भुजबळ, देवळाली-सरोज अहिरे, निफाड-दिलीप बनकर, दिंडोरी-पेठ-नरहरी झिरवळ, सिन्नर-ऍड्‌. माणिकराव कोकाटे 
शिवसेना : मालेगाव बाह्य-दादा भुसे, नांदगाव-सुहास कांदे 
कॉंग्रेस : इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर-हिरामण खोसकर 
एम. आय. एम. :मालेगाव मध्य-मौलाना मुफ्ती ईस्माईल 
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष : कळवण-सुरगाणा-जे. पी. गावीत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019 : NASHIK : NCP and BJP fight hard