अकरावी प्रवेशात धाकधूक कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे.

नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे.

त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकांची छपाई रखडली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रश्‍नावर येत्या आठवडाभरात तोडगा निघण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातील निवडक शहरांमध्ये महापालिका हद्दीत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीचे प्रवेश ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने दिले जात असतात. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रात शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने दिले जाणार आहेत. 

प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून माहिती पुस्तिकांचे वाटप होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप माहिती पुस्तिका उपलब्ध झालेल्या नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Admission Issue Education Maratha Reservation Supreme Court