Dhule News : शहरातील लँड जिहाद रोखा; भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Encroachment

Dhule News : शहरातील लँड जिहाद रोखा; भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

धुळे : शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण (लॅंड जिहाद) सुरू आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रश्‍नाकडे वेळीच लक्ष घालून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी भाजपने (BJP) जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. (Encroachment is going on in city on a large scale police administration should pay attention stop this BJP demand dhule news)

भाजपचे नगरसेवक हिरामण गवळी, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिनेश बागूल, भारतीय जनता युवा मोर्चाचे रोहित चांदोडे आदींनी मागणीचे निवेदन दिले. धुळे शहरातील नटराज टॉकीजशेजारील ८० फुटी रोडलगतच्या सर्व्हे क्रमांक ३८७ क मधील फायनल प्लॉट-२९ मधील पोलिस ठाणे जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले.

मात्र, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करण्यात येत आहे. तसेच आरक्षण क्रमांक-१०५ हॉस्पिटल आणि प्रसूतिगृह जागेसाठी नवीन बेकायदेशीर वॉल कंपाउंड करण्यात आले आहे. हा एक प्रकारे लँड जिहादचा प्रकार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

याबाबत मनपाकडून माहिती मागितली असता, त्यांनी खुलासा दिला की कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता संबंधित आरक्षित जागेवर बेकायदेशीरपणे वॉल कंपाउंड करण्यात आले आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

तसेच चंद्रशेखर आझादनगरमधील अभय कॉलेजकडील परिसरात जवळपास २५ ते ३० हजार लोकवस्तीचा भाग आहे. त्या भागात जाण्यासाठी एकमेव रस्ता हा नटराज टॉकीजलगतचा असल्याने त्या ठिकाणी काही समाजकंटक घोळका करून उभे राहतात. त्यात काही स्थानिक लोकांनी अतिक्रमण करून भंगाराची दुकाने लावली आहेत.

काही दिवसांपूर्वी एका दूध विक्रेत्याची फोरव्हीलर गाडी थांबवून विनाकारण मारहाण करण्यात आली. ही गाडी एमएसईबी इलेक्ट्रिक डीपीलगतच्या खांबाला वारंवार ठोकून गाडीसह इलेक्ट्रिक खांबाचे नुकसान करण्यात आले.

समाजकंटकांकडून महिलांची छेडखानी करण्याचे प्रकारदेखील अनेकदा घडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तेथील लोकवस्तीतील लोकांनी त्यांची घरे विकून त्यांना पलायन करण्यास भाग पाडण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. या गोष्टीस आळा घालावा, तसेच नटराज टॉकीजशेजारील आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढून पोलिस ठाणे लवकरात लवकर उभारावे, अशी मागणी भाजपने केली.

टॅग्स :DhuleRoad Development