Sakal Impact : घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेचा आढावा, ‘एसआय’च्या बदल्या करा; महापौर प्रतिभा चौधरी

Mayor Pratibha Chaudhary speaking at the review meeting of Municipal Public Health Department
Mayor Pratibha Chaudhary speaking at the review meeting of Municipal Public Health Department esakal

धुळे : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात (Public Health Department) सुरू असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर महापौर प्रतिभा चौधरी यांनी तातडीचे बैठक घेत याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. (Referring to sakal newspaper published news Mayor asked senior officials about what is going on in Public Health Department dhule news)

स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या करा, सहाय्यक आरोग्याधिकाऱ्याची नियुक्ती करा, असा आदेशही महापौर श्रीमती चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने मूळ विभागाच्या अधिकाऱ्यांना डावलल्याच्या तक्रारी आहेत.

यावरून अधिकाऱ्यांमध्ये नाराजीसह धुसफूस सुरू आहे. हा विषय ‘सकाळ’ने २७ फेब्रुवारीच्या अंकात मांडला. या वृत्ताची दखल घेत तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी महापौर श्रीमती चौधरी यांनी सोमवारी (ता. २७) महापालिकेतील आपल्या दालनात बैठक घेतली.

उपमहापौर नागसेन बोरसे, माजी उपमहापौर तथा विद्यमान स्थायी समिती सदस्या कल्याणी अंपळकर, स्थायी समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सुनील बैसाणे, उपायुक्त विजय सनेर, कार्यालयीन प्रमुख राजेंद्र माईनकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, प्रमोद चव्हाण, गजानन चौधरी, शुभम केदार, गौरव माळी, रूपेश पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Mayor Pratibha Chaudhary speaking at the review meeting of Municipal Public Health Department
Shrikant Shinde News: आमचे सरकार ‘ऑफलाईन’ : शिंदे

महापौर श्रीमती चौधरी यांनी ‘सकाळ’च्या वृत्ताचा संदर्भ देत सार्वजनिक आरोग्य विभागात हे काय सुरू आहे, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली. असल्या प्रकारामुळे शहर स्वच्छतेसह विविध कार्यक्रमांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, बैठकीत शैक्षणिक योग्यतेनुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या न होणे, वर्षानुवर्षे एकाच भागात काम करणाऱ्या विशेषतः स्वच्छता निरीक्षकांच्या कामाबद्दल चर्चा झाली. त्याअनुषंगाने महापौर श्रीमती चौधरी यांनी स्वच्छता निरीक्षकांच्या तातडीने बदल्या करा, असा आदेश दिला. तसेच विभागाचा प्रमुख सहाय्यक आरोग्याधिकारी असतो.

मात्र, या पदावर नियुक्तीच नाही. त्यामुळे सहाय्यक आरोग्याधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्तीचा विषय हा आयुक्तांच्या अखत्यारीत असल्याचा मुद्दा उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडला. त्यामुळे या विषयावर आता आयुक्त काय भूमिका घेतात याकडे लक्ष असणार आहे.

जनजागृतीसह तक्रारी सोडवा

शहरातील ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे, गटारातील गाळ काढल्यानंतर तो त्याच दिवशी उचलणे, संबंधित स्वच्छता निरीक्षक यांनी या कामावर नियंत्रण ठेवणे, वर्तमानपत्रात आलेल्या स्वच्छता, कचरा संकलनाच्या तक्रारीची नोंद स्वयंभू कंपनीला देऊन त्याबाबत कार्यवाही करणे, नागरिक व नगरसेवकामध्ये समन्वय ठेवून स्वच्छतेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही महापौर श्रीमती चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Mayor Pratibha Chaudhary speaking at the review meeting of Municipal Public Health Department
Dhule News : ‘त्या’ बालकांच्या संगोपन अनुदानात वाढ; एप्रिलपासून अंमलबजावणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com