Dhule News : छाईलचा कृष्णा होणार डॉक्टर; उद्योजक नांद्रे, निसर्गमित्र समिती आली मदतीला धावून!

While giving a check to Krishna Kuvar in Bimalbai College, Dr. Ahire, Principal Sonwane.
While giving a check to Krishna Kuvar in Bimalbai College, Dr. Ahire, Principal Sonwane.esakal

कासारे (जि. धुळे) : मालपूर (ता. साक्री) येथील उद्योजक रामराव नांद्रे यांनी एमबीबीएसचा (MBBS) विद्यार्थी कृष्णाला उच्च शिक्षणासाठी मदतीचा संकल्प सोडला. (Entrepreneur Ramrao Nandre resolved to help MBBS student Krishna for higher education dhule news)

निसर्गमित्र समितीच्या मध्यस्थी हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. छाईल (ता. साक्री) येथील कृष्णा संदीप कुवर यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. एका प्रतिष्ठित परिवारातील कृष्णाचे आई-वडील शेतीव्यवसाय व शेतीपूरक कुक्कुटपालनाचा उद्योग करत होते.

कार्यकर्तृत्वाने वडील संदीप कुवर यांनी छाईलच्या सरपंचपदासह विविध कार्याकारी सहकारी संस्थेचे पद सांभाळले. सामाजिक कार्यातून राजकीय पार्श्वभूमी निर्माण केली होती. अतिशय सुखीसंपन्न परिवार मुला-मुलीच्या शिक्षणासाठी नाशिक येथे स्थलांतरित होऊन मुलांच्या शिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

मुलगा कृष्णा एमबीबीएससाठी असणाऱ्या पात्रता परीक्षेत उत्तम गुण संपादन करून उत्तीर्ण झाला. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय कोट्यात कृष्णाचा प्रवेश झाला. परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र काळाला हे मंजूर नव्हते. दुर्दैवाने संदीप कुवर यांना दुर्धर आजाराने ग्रासले. आर्थिक उत्पन्नाचे स्रोत थांबले.

उपचारादरम्यान कुवर यांचे निधन झाले. त्यामुळे कृष्णाला शिक्षणासाठी अडचण निर्माण झाली. निसर्गमित्र सेवाभावी संस्थेने दत्तक घेतलेल्या रामनगर या आदिवासी वस्तीत ‘चला, आदिवासींसोबत दिवाळी साजरी करू’ या उपक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलावलेल्या

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

While giving a check to Krishna Kuvar in Bimalbai College, Dr. Ahire, Principal Sonwane.
Red Onion Purchase | नाफेडमार्फत जिल्ह्यात लाल कांदा खरेदी सुरू : डॉ. भारती पवार

डोंबिवलीस्थित उद्योजक रामराव नांद्रे यांनी आपल्या मनोगतातून आवाहन केले होते, की उच्च शिक्षणापासून सामान्य परिवारातील विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी आमच्या उद्योगसमूहातर्फे शिष्यवृत्तीच्या स्वरूपात अर्थसहाय्य आम्ही देऊ, म्हणून निसर्गमित्र समितीच्या सदस्यांनी कृष्णाचे नाव सुचविले.

प्रथमतः एक लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर केली व शिक्षण पूर्ण होईपर्यंत सहा महिन्यांत ५० हजार रुपये याप्रमाणे धनादेश देण्याचे जाहीर केल्याप्रमाणे गेल्या २१ डिसेंबर २०२२ ला पहिला धनादेश प्रदान केला.

शनिवारी (ता. २५) विमलबाई उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय साक्री येथे प्राचार्य पी. एस. सोनवणे, प्राचार्य डॉ.रा जेंद्र अहिरे, डॉ. लहू पवार, प्रा. अजय नांद्रे यांच्या हस्ते कृष्णाकडे दुसरा ५० हजारांचा धनादेश दिला.

"सितसन इंडिया मुंबई कंपनीचे मालक रामराव नांद्रे व दिलीप भामरे विद्यार्थ्यांच्या पाठीशी देवदूतासारखे उभे राहिले. त्यांच्या आशीर्वादाने मी चांगल्या गुणांनी ही पदवी संपादन करेन व वडिलांचे, परिवाराचे सप्न पूर्ण करेन व सामान्य जनतेसाठी कार्य करेन." -कृष्णा कुवर, वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी

While giving a check to Krishna Kuvar in Bimalbai College, Dr. Ahire, Principal Sonwane.
Nashik Political: अमित ठाकरेंच्या पाठोपाठ श्रीकांत शिंदेही आज नाशिकमध्ये! राजकारणातील नव्या पिढीचा दम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com