धुळे- वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत धुळे महापालिकेकडून या वर्षी तब्बल एक लाख तीन हजार ५०० वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यात ४० हजार रोपे मियावाकी पद्धतीने लावण्यात येणार आहेत. तर २० हजार बांबूंची रोपे अक्कलपाडा प्रकल्प व परिसरात लावण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होऊ शकेल अशा ठिकाणी हे वृक्षलागवडीचे काम होणार असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने धुळे महापालिकेकडून चांगले काम उभे राहील, अशी अपेक्षा आहे.