'देशातील कोणताच पक्ष शेतकऱ्यांच्या हिताचा नाही'

राजेश सोळंकी
रविवार, 29 जुलै 2018

देशातील कोणताही पक्ष शेतकर्‍यांच्या हिताचा नाही त्यांचा शेतकरी हा विषयच नाही. मात्र, स्वाभिमानी शेतकरी पक्षच देशात अशी एकमेव पार्टी आहे की ज्यांना शेतकऱ्यांचा विकास साधायचा आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा वचननामा शेतकरी हिताचा असून शेतकरी बचावाचा आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडविण्याचे धसास लावण्यास कार्य स्वाभिमानी शेतकरी पक्ष प्रामाणिकपणे करीत आहे. याच शेतकरी हिताच्या पक्षासाठी माझी वर्धा लोकसभा क्षेत्राची शेवटची उमेदवारी राहील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनी केले.

आर्वी (वर्धा) - देशातील कोणताही पक्ष शेतकर्‍यांच्या हिताचा नाही त्यांचा शेतकरी हा विषयच नाही. मात्र, स्वाभिमानी शेतकरी पक्षच देशात अशी एकमेव पार्टी आहे की ज्यांना शेतकऱ्यांचा विकास साधायचा आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा वचननामा शेतकरी हिताचा असून शेतकरी बचावाचा आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडविण्याचे धसास लावण्यास कार्य स्वाभिमानी शेतकरी पक्ष प्रामाणिकपणे करीत आहे. याच शेतकरी हिताच्या पक्षासाठी माझी वर्धा लोकसभा क्षेत्राची शेवटची उमेदवारी राहील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनी केले.

आर्वीतील विश्रामगृहात शनिवारी (ता.28) दुपारी ते बोलत होते. यावेळी, भास्कर इथापे पवन तिजारे, रवी पडोळे, भास्कर राऊत डॉ. शरद बावणे चंद्रशेखर वानखेडे, डॉ. गौरव वाघ, पुरुषोत्तम शिर्के, माजी मुख्यध्यपक राजानंद वानखडे, प्राध्यापक सुरेंद्र डाफ, टेकचंद मोटवानी, अंनिसचे प्रशांत नेपटे, संभाजी ब्रिगेडचे प्रफुल क्षीरसागर समता संघटनेचे खारकर, जिचकार, धीरज मानमोडे, शैलेश कदम, माजी नगरसेवक राकेश एलचटवार, सतीश इंगळे, कानफाडे, मनोज तळेकर, एडवोकेट ठाकरे, राजू कुकडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी भास्कर इथापे रवी पडोळे डॉक्टर बावणे डॉक्टर गौरव वाघ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्याच्या भरवशावर देश आहे ही अर्थव्यवस्था आहे. शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर आपणा सर्वांना शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहावे लागेल तेही शेतकऱ्यांचे मित्र म्हणून मनापासून असेही सुबोध मोहिते पाटील यांनी सांगितले.

Web Title: ex central minister subodh mohite patil criticise on all political parties