Dhule Crime News : कावठी शिवारात बनावट मद्यनिर्मिती उघड; मुख्य संशयित दिनू डॉन फरार

Police officers and staff including the suspected accused and the accused
Police officers and staff including the suspected accused and the accusedesaka

सोनगीर (जि. धुळे) : धुळे तालुका व सोनगीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बनावट दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या माध्यमातून कावठी (ता. धुळे) शिवारात नकली मद्यनिर्मिती कारखान्याचा छडा लागला. रविवारी (ता.४) कारखान्यावर छापा टाकून सुमारे ९५ लाखांवर मुद्देमाल जप्त करत दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील आठ संशयितांना अटक केली असून मुख्य संशयितासह दोघे फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे. (Fake brewery exposed in Kavathi Shivara Main suspect Dinu Don absconding Dhule Latest Crime News)

धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार फागणे ते बाभुळवाडी (ता. धुळे) रस्त्याने ट्रकमधून (एमएच ४१ एयू २१२४) बनावट मद्याची वाहतूक होणार होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. ट्रकला अडवून चालकाची विचारपूस केली असता सोपान रवींद्र परदेशी (रा. शिरुड, ता.धुळे) असे त्याने नाव सांगितले.

वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉकेट देशी दारु संत्रा नामक खाकी रंगाचे शंभर खोके, प्रत्येक खोक्यात मद्याच्या ९० मिली क्षमतेच्या प्लॅस्टीकच्या शंभर सीलबंद बाटल्या आढळल्या. पथकाने मुद्देमाल जप्त करून धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला. सोपान परदेशी याची कसून चौकशी केली असता पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली.

Police officers and staff including the suspected accused and the accused
Jalgaon Crime News : रिक्षातून ओढून महिलेवर चाकू हल्ला प्रकरणी चुलत सासऱ्यास सश्रम कारवास!

ट्रकमधील माल कावठी (ता. धुळे) गावच्या शिवारातील बनावट मद्यनिर्मिती कारखान्यातून आणल्याची कबुली त्याने दिली. त्या माहितीच्या आधारे पथकाने सोपान परदेशीला सोबत घेत बनावट मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला. त्यात २० लाखांचा ट्रक (एमएच ४१ एयू २१२४), ट्रकमधून ३ लाख ५० हजारांच्या रॉकेट देशी बनावटीच्या एक हजार बाटल्यांचे १०० खोकी, १६ लाख ५० हजारांचे स्पिरीटने भरलेले ३० प्लॅस्टीक ड्रम, एक लाखाचे बुच भरलेली २० खोकी, चार लाख ९० हजारांच्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे ७० बॉक्स, एक लाख २९ हजारांचे देशी बनावट रॉकेट संत्रा तयार दारुचे ३७ बॉक्स,१४ हजार ८०० रुपयांची ५०० लिटर तयार दारू, ११ लाखांची स्कार्पिओ, २५ लाखांचे दारुच्या बाटल्यांना सील व स्टिकर्स लावण्याचे मशिन, ७० हजारांच्या दोन दुचाकी (एमएच १८ एएच ९७१६, एमएच १८ बीबी १८६७), दोन लाखांचे जनरेटर, अडीच लाखांचे संशयितांच्या ताब्यातील आठ मोबाईल, १० हजारांचे बाटल्यांचे बॉक्स चिटकविण्यासाठी लागणाऱ्या टेपचे दोन बॉक्स, दहा हजारांचे बाटल्यांवर चिटकविण्यासाठी लागणाऱ्या स्टीकर्सचे दोन बॉक्स असा सुमारे ९५ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल बनावट दारुच्या कारखान्यातून जप्त केला.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

Police officers and staff including the suspected accused and the accused
Jalgaon News : आणखी 22 शेतकऱ्यांना मिळणार जमिनी; सावकारी पाशातून मुक्ततेसाठी जलद सुनावणी सुरू

यांच्याविरोधात गुन्हा दाखल

सोपान रवींद्र परदेशी, सागर बापू भोई (दोन्ही रा. इंदिरानगर, शिरुड ता. धुळे), शांतीलाल उत्तम मराठे (रा. वरचेगाव, मराठे गल्ली, शिरपूर), सुनील सुधाकर देवरे, सचिन सुधाकर देवरे (दोन्ही रा. कालिका मंदिराजवळ, शिरुड ता. धुळे), ज्ञानेश्वर बाबूसिंग राजपूत (रा. दहिंदुले ता. जि. नंदुरबार), नितीन रंगनाथ लोहार (रा. प्रभाकरनगर, शिरुड ता. धुळे), दिनेश निंबा गायकवाड, राहुल अहिरराव ऊर्फ राहुल मास्तर (रा. साक्री) व ट्रकचालक गुलाब शिंदे (रा. कावठी ता. धुळे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. यातील आठ संशयितांना अटक केली.

मुख्य संशयित दिनेश निंबा गायकवाड ऊर्फ दिनू डॉन व गुलाब शिंदे फरार आहेत. दरम्यान पोलिस निरीक्षक शिंदे यांचे या कारवाईबद्दल कौतुक करून पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी कारवाई पथकाला दहा हजारांचे रोख बक्षीस दिले. सागर काळे, महादेव गुट्टे, प्रवीण पाटील, मुकेश पवार, अविनाश गहीवड, नितीन दिवसे, अमोल कापसे, दीपक पाटील, नंदू चव्हाण, वसंत वाघ, सोनगीरचे सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील व सहकारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एकाला नंदुरबारमधून ठोकल्या बेड्या

या प्रकरणातील मास्टर माईंड फरार असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी राहुल अहिरराव ऊर्फ राहुल मास्तर (रा. साक्री) याची कुंडली काढली. तो नंदुरबारमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक पाटील यांनी नंदुरबार पोलिसांना सतर्क केले. नंदुरबार पोलिसांनी राहुल मास्तरचा शोध घेऊन त्यास बेड्या ठोकल्या. संध्याकाळी उशिरापर्यंत त्याला धुळ्यात आणले गेले. मुख्य सूत्रधार दिनेश निंबा गायकवाड ऊर्फ दिनू डॉन फरार असला तरी त्याच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील. त्याबरोबरच अन्य एक संशयित गुलाब शिंदे (रा. कावठी) हादेखील फरार आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती एनसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.

Police officers and staff including the suspected accused and the accused
Jalgaon News : हक्काचे पाणी गेले वाहून; वाया जाणाऱ्या पाण्यावर नदीजोडचीच मात्रा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com