Dhule Fake Fertilizer Case : खानदेशातील 19 कृषी सेवा केंद्रे ‘रडार’वर

Fake Fertilizer Case  dhule
Fake Fertilizer Case dhuleesakal

Dhule Fake Fertilizer Case : येथील ‘एमआयडीसी’तील बनवाट खतसाठा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि यासंदर्भात ‘सकाळ’ने शेतकरी हितासाठी विशेष वृत्त मालिका सुरू केल्यावर नाशिक विभागीय कृषी सहसंचालकांनी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील १९ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याचा आदेश यंत्रणेला दिला आहे.

तपासणीत हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा, तर खत विक्रेत्यांनी तरतुदीचे उल्लंघन केले असल्यास त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देशही सहसंचालकांनी दिले आहे. त्यामुळे जिल्हा कृषी यंत्रणेसह खत विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहेत. (Fake Fertilizer Case system ordered to inspect 19 agricultural service centers in Khandesh dhule news)

मोहाडी पोलिस ठाण्यात भूमी क्रॉप सायन्सचा चालक नरेंद्र श्रीराम चौधरी (रा. धुळे), मे. फार्म सन्स फर्टीकम प्रा. लि. (सुरत), मे. ग्रीन फिल्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा. लि.चा (तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) समावेश आहे.

फिर्यादीत १८ः१८ः१० या खताच्या ब्रॅड नेममध्ये कृषी राजा, कृषी सम्राट, तसेच काही दाणेदार खत बनावट स्वरूपाचे असल्याचा उल्लेख आहे. तपासणीतील नमुन्यात फॉस्पो जिप्सम (ग्रॅन्युअल) असल्याचा संशय व्यक्त झाला आहे.

फॉस्पो जिप्सम गुजरातमधून फक्त दोन रुपयांत खरेदी करून ते संगनमताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रती ५० किलो गोणीप्रमाणे तब्बल १२३५ रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सहसंचालकांचा आदेश

या पार्श्वभूमीवर कृषी सहसंचालकांनी आदेशात म्हटले आहे, की सातारा येथील मे. ग्रीन फिल्ड ॲग्रीकेम खत कंपनीचे मुख्य वितरक मे. भूमी क्रॉप सायन्सच्या कार्यालयात काही अभिलेखे आढळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fake Fertilizer Case  dhule
Dhule Fake Fertilizer Scam : जिल्ह्यात किती गोण्यांचे वितरण? फिर्यादीत वितरकांची नावे येणार की नाहीत?

त्यातून धुळे व जळगाव जिल्ह्यातील १९ कृषी सेवा केंद्रांची यादी तयार केली आहे. त्यांना वितरकाने संशयित १८ः१८ः१० मिश्र खतपुरवठा केला आहे.

त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी खत निरीक्षकांमार्फत खत विक्रेत्यांची तपासणी करावी. खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतूदींचे उल्लंघन करणाऱ्या खत विक्री केंद्रातील संशयित खताचा साठा जप्त करावा, तसेच खत विक्रेत्यांचा विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.

यात परवानाधारक खत विक्री केंद्रातून शेतकऱ्यांना विक्री केलेल्या खताच्या याद्या तयार करून अहवाल दोन दिवसांत सादर करावा. तसेच कृषी सेवा केंद्रांचा किटकनाशके, बियाणे विक्री केंद्राच्या तपासणीतून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

शेतकऱ्यांना नित्कृष्ट निविष्ठांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा, हलगर्जीपणा करणाऱ्या खत निरीक्षकावर प्रशासकीय कारवाई केली जाईल.

Fake Fertilizer Case  dhule
Fake Fertilizer News : 'त्या’ खतामध्ये केवळ ६ टक्के पोटॅश; शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ

तपासणीतील कृषी सेवा केंद्रे

धुळे जिल्हा ः ओमसाई कृषी सेवा केंद्र (म्हसदी, ता. साक्री), ओम (म्हसदी), ओम (साक्री), वर्षा (पिंपळनेर), बालाजी ॲग्रो (दहिवेल, ता. साक्री), दोस्ती फर्टीलायझर (दिघावे, ता. साक्री), कन्हय्यालाल (रोहोड- पिंपळनेर, ता. साक्री), मातृभूमी (रोहोड- पिंपळनेर), तिरूपती (पिंपळनेर), यशवंत ॲग्रो (पिंपळनेर), न्यू माऊली (बेहेड, ता. साक्री), रघुवीर समर्थ (तरवाडे, ता. धुळे), जानकी (नेर, ता. धुळे), नंदुरबार जिल्हा ः समृध्दी ॲग्रो (शहादा), न्यू जय सिताराम कृषी सेवा केंद्र (मलोनी, ता. शहादा). जळगाव जिल्हा ः लिलाधर चौधरी, नांदेड (ता. धरणगाव), चौधरी कृषी सेवा केंद्र (कळमसरा, अमळनेर), फलक कृसेके (अमळनेर), धीरज कृसेके (अमळनेर).

कृषी केंद्रांकडून वितरक रेकॉर्डवर

बनावट खतसाठा हा सोनगीर, नेर, शिरपूर येथील संबंधित वितरकांकडून ठिकठिकाणच्या कृषी सेवा केंद्रांकडे विक्रीसाठी गेला. अशा केंद्रांच्या तपासणीतून आता कुठल्या वितरकाकडून बनावट खतसाठा विक्रीसाठी आला हेही रेकॉर्डवर येऊ शकेल.

त्यामुळे कृषी यंत्रणेतील महाभागांनी वादग्रस्त त्या वितरकांना अभय देण्याचा प्रयत्न केला, तर ते कारवाईच्या कक्षेत येऊ शकतील. पावसाळी अधिवेशनातून हा प्रश्‍न राज्य सरकारच्या पटलावर गेल्याने त्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा कृषी यंत्रणा व पोलिसांना तपास करावा लागणार आहे. त्याकडे फसवणूक झालेल्या शेतकरी वर्गाचे लक्ष आहे.

Fake Fertilizer Case  dhule
Dhule Fake Fertilizer Scam : जिल्ह्यात किती गोण्यांचे वितरण? फिर्यादीत वितरकांची नावे येणार की नाहीत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com