गव्हातील किड नियंत्रणासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड; कोणता ? वाचा सविस्तर !

जगन्नाथ पाटील   
Monday, 28 December 2020

एकरी सात पिशव्या काठीला बंदिस्त केल्या. केवळ एका रात्रीत हजारो किडी त्यावर चिपकलेल्या आढळल्या.

कापडणे : कापसासह इतर पिकांतील किड आणि किटक नियंत्रणासाठी फोरमन ट्रॅप वापरले जाते. ते नेहमीच वापरण्यासाठी खर्चिक आहे. यावर घरगुती देशी जुगाड वडणे (ता.धुळे) येथील कृृृृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दिलीप पाटील यांनी केला आहे.

आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूक: उमेदवार मिळू नये यासाठी रचले जातायं डावपेच, ते कोणते ? वाचा सविस्तर

कृृषीभूषण दिलीप पाटील हे विविध प्रयोग करण्यासाठी जिल्ह्यात प्रसिध्द आहेत. गहू पिकाची जोमदार वाढ होत आहे. आगामी काळात किडकीटक नियंत्रण कसे करावे, यासाठी ते विचारात होते. फोरोमन ट्रपला एकरी हजारावर खर्च येतो. त्यासाठी वापरल्या जाणार्‍या गोळ्याही शेतकर्‍यांसाठी महागच आहेत.

बिनखर्चित फोरोमन ट्रप

पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टीक बॅगचा वापर कल्पक पध्दतीने केला. अन किडकीटक नियंत्रणात आले आहे. परीसरातील शेतकर्‍यांसाठी बिनखर्चिक फोरोमन ट्रप तयार झाला आहे.

खराब आईल पिशवींना लावले

प्लॅस्टीक पिशवींना मोटरसायकलीचे खराब ऑइलचा स्र्पे मारला. एकरी सात पिशव्या काठीला बंदिस्त केल्या. केवळ एका रात्रीत हजारो किडी त्यावर चिपकलेल्या आढळल्या. विशेष म्हणजे पांढर्‍या पिशवीवर एकही किटक चिपकलेला आढळलेला नाही.

आवर्जून वाचा- पिल्लू विहिरीत पडल्याने मादी बिबट्याने फोडला मातृत्वाचा हंबरडा..आणि सुरू झाले रेस्क्यू ! 

वीस वर्षापासून सेंद्रीय शेती

दरम्यान कृषीभूषण पाटील हे गेल्या वीस वर्षांपासून सेंद्रीय शेती कसत आहेत. स्वतः निबोंणी अर्क तयार करतात. सेंद्रीय गहू, बाजरी व इतर कडधान्य अॅडव्हान्स बुक झालेले असते. इतर बाजारभावापेक्षा अधिकचा भाव मिळत असतो. ते सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार करीत असतात.

 

या घरगुती फोरोमन ट्रॅपमुळे शेतकर्‍यांची आर्थिक बचत होणार आहे. किटक नियंत्रण अधिक प्रमाणात होवून उत्पादन वाढणार आहे.
कृषीभूषण दिलीप पाटील, वडणे.

 

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmar marathi news kapadne dhule wheat kid experiment using plastic bag