Dhule Agriculture News : पावसाअभावी मक्याचे भुणके दाण्यांविना; मक्याच्या शेतात सोडली गुरे..!

Devbhane: Rains stopped for a month. Cattle left in the field because the farmer did not fill the grain in the corn husk.
Devbhane: Rains stopped for a month. Cattle left in the field because the farmer did not fill the grain in the corn husk. esakal

Dhule Agriculture News : धुळे तालुक्यासह जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. तब्बल ३५ दिवसांनी पावसाचे पुनरागमन झाले. बाजरी, ज्वारीची कणसे व मक्याच्या भुणक्यात दाणे भरणेच झाले नाही. दाण्यांविना पिके उभी आहेत.

पुरेशी वाढही झालेली नाही. अशा पिकांना कापणीचा खर्च करण्यापेक्षा त्यात गुरे सोडून चारली जात आहेत. (farmer left cattle in corn farm dhule news)

काही शेतकऱ्यांनी गायी-म्हशी पाळणाऱ्यांना दोन-चार हजारांत चारण्यासाठी दिली आहेत. दुष्काळाची गंभीर स्थिती स्पष्ट होत आहे. धुळे जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढतच चालली आहे. मूग, उडीद व मठ ही पिके पावसाअभावी ऑगस्टमध्येच करपली.

ही नगदी पिके वाया गेल्याने, ऐन हंगामात शेतकऱ्यांनी शून्य कमाई झाली. हा हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. ज्वारी, बाजरी, मका आणि कपाशी ही पिके तग धरून उभी होती. त्यांना पावसाअभावी दाणे भरले गेले नाहीत. कणसे आणि भुणके रिकामीच आहेत. त्यांची पुरेशी वाढ झालेली नाही.

Devbhane: Rains stopped for a month. Cattle left in the field because the farmer did not fill the grain in the corn husk.
Dhule Agriculture News : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडीस प्रारंभ; चिखलणी करून भातरोपणी

ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत, त्यांनी निदान चारा तरी वैरण म्हणून कामास येईल म्हणून पिके कापण्यास सुरवात केली. ज्यांच्याकडे गुरेढोरे नाहीत, ते मेंढपाळ, अधिक संख्येने गुरे असणाऱ्यांना अल्पभावात चारा विक्री करीत आहेत. काही शेतात चाराही कापण्याचा खर्च निघणार नसल्याने, त्यांनी उभ्या पिकात गुरेढोरे व शेळ्यामेंढ्या सोडल्या जात आहेत.

''धुळे तालुक्यात दुष्काळाची दाहकता मोठी आहे. पिके काढणीचाही खर्च निघत नाही. शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. सरकारने सरसकट दुष्काळ घोषित करून मदत करावी.''-प्रवीण पाटील, युवा शेतकरी व उपसरपंच, कापडणे

Devbhane: Rains stopped for a month. Cattle left in the field because the farmer did not fill the grain in the corn husk.
Dhule Agriculture News : तेल्यामुक्त डाळिंबबागेसाठी प्रत्येक फळास पेपर रॅपिंग; शेतकऱ्यांची धडपड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com