Dhule Agriculture News : तेल्यामुक्त डाळिंबबागेसाठी प्रत्येक फळास पेपर रॅपिंग; शेतकऱ्यांची धडपड

Farmers Rajendra Bhamre (Beyhead), Bhatu Bedse (Kakani) inspecting the paper wrapping of fruits in a pomegranate orchard in Shiwarat, Limbucha Mala.
Farmers Rajendra Bhamre (Beyhead), Bhatu Bedse (Kakani) inspecting the paper wrapping of fruits in a pomegranate orchard in Shiwarat, Limbucha Mala. esakal

Dhule Agriculture News : अलीकडे परकीय देशांत डाळिंब पिकास बऱ्यापैकी दर मिळत असल्याने तेल्यामुक्त डाळिंबबागा जतन करण्यासाठी शेतकरी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.

तेल्यापासून डाळिंबाचे प्रत्येक फळ सुरक्षित राहावे म्हणून सध्या फळांना पेपर रॅपिंग अर्थात कागद गुंडाळला जात आहे. हे काम मोठ्या आर्थिक खर्चाचे असले तरी भाद्रपद महिन्यातील तीव्र उन्हापासूनही संरक्षण होईल असा विश्वास शेतकऱ्यांना वाटत आहे. (Paper wrapping for each fruit for oil free pomegranates dhule Agriculture News)

यंदा बहुतेक ठिकाणी तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबबागा संकटात सापडल्या आहेत. ककाणी, म्हसदी, दिघावे, काळगाव, बेहेड, दारखेल, नाडसे(ता. साक्री) आदी परिसरात डाळिंबबागा अस्तित्व टिकवून आहेत. सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करत फळशेती करणे अवघड होत असल्याचे चित्र आहे.

यंदा आजपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नाही. केवळ भिजपावसात खरीप पेरण्या गुंडाळण्यात आल्या. जोरदार पावसाच्या प्रतीक्षेसाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आज येईल, उद्या येईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे केली आहेत.

विहिरींच्या उपलब्ध पाण्यावर बागायती पिके जगविली जात आहेत. फळबागायती ठिबक सिंचनाद्वारे जतन केल्या जात असल्या तरी नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

फळाच्या सुरक्षिततेसाठी पेपर रॅपिंग

बेहेड (ता. साक्री) येथील लिंबूचा मळा शिवारात राजेंद्र निंबाजी भामरे (काळगावकर) यांच्या नऊ एकर क्षेत्रात सुमारे साडेतीन हजार डाळिंबाची झाडे आहेत. वातावरण बदलाचा परिणाम डाळिंबबागेवर होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmers Rajendra Bhamre (Beyhead), Bhatu Bedse (Kakani) inspecting the paper wrapping of fruits in a pomegranate orchard in Shiwarat, Limbucha Mala.
Akola Agriculture News : शेतकऱ्यांभोवती विषबाधेचा फास, आतापर्यंत सात शेतकऱ्यांना विषबाधा; काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

दुसरीकडे तेल्यामुक्त डाळिंब बागेसाठी कीटकनाशक फवारणीसह अन्य विविध मार्गांनी बागा संरक्षित राहाव्यात म्हणून शेतकरी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.

सांगोला (जि. सोलापूर) येथील अनुभवी मजुरांकडून पेपर रॅपिंग अर्थात कागद गुंडाळणी काम केले जात आहे. एक कागदाच्या गणतीनुसार मजुरी दिली जात आहे. झाडावरील प्रत्येक फळ कागदाने गुंडाळले जात असल्याने ते काम स्थानिक मजुरांकडून अशक्य आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अनुभवी मजुरांकडून पेपर रॅपिंग काम केले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्थानिकसह बाहेर देशातील दुबई, रशिया, बांगलादेश, नेपाळ आदी बाजारपेठेत डाळिंब पिकास मागणी वाढल्याने दर बऱ्यापैकी मिळत असल्याने शेतकरी डाळिंब पिकाची विशेष काळजी घेत आहेत.

पारंपरिक शेतीऐवजी शेतकरी फळ व भाजीपाला पिकाकडे अधिक लक्ष केंद्रित करीत आहेत. इतर पिकांपेक्षा फळ पिके काढणीपर्यंत नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती शेतकरी राजेंद्र निंबाजी भामरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Farmers Rajendra Bhamre (Beyhead), Bhatu Bedse (Kakani) inspecting the paper wrapping of fruits in a pomegranate orchard in Shiwarat, Limbucha Mala.
Dhule Agriculture News : नैसर्गिक शेतीतून 6 लाखांचे निव्वळ उत्पन्न; प्रगतिशील शेतकऱ्याचा विषमुक्त शेतीवर भर

भाद्रपद महिन्यातील उन्हापासूनही संरक्षण

भाद्रपद महिन्यातील उन्हापासूनही पेपर रॅपिंगमुळे फळांचे संरक्षण होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कारण भाद्रपद महिन्यात महिनाभर तीव्र उन्हाचे चटके बसत असतात. उन्हामुळे चट्टे पडत फळाची प्रत खराब होते.

फळांवर रात्रीच्या वेळी फळपाकळी डंख मारते. फळास कागदी आवरण असल्यामुळे फळ दिसत नसल्यामुळे फळपाकळी डंख मारू शकत नाही म्हणून फळपाकळीपासूनही संरक्षण मिळू शकते.

"डाळिंबाच्या फळास पेपर रॅपिंग केल्याने काही प्रमाणात तेल्यापासून संरक्षणासह भाद्रपद महिन्यातील ऑक्टोबर हीटपासून बचाव होतो. फळाची प्रतवारीही चांगली राहते. शिवाय फळपाकळीपासूनदेखील संरक्षण मिळू शकते." -राजेंद्र निंबा भामरे, डाळिंब बागायतदार शेतकरी, बेहेड (ता. साक्री)

Farmers Rajendra Bhamre (Beyhead), Bhatu Bedse (Kakani) inspecting the paper wrapping of fruits in a pomegranate orchard in Shiwarat, Limbucha Mala.
Dhule Agriculture News : क्रांतिकारकांच्या गावाचा मुळा खातोय भाव; सुरत, शहादा बाजारात लिलावास प्रथम प्राधान्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com